शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'फी' न दिल्याच्या रागातून शाळा प्रशासनाची हिन वागणूक, विद्यार्थ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न

By अनंत खं.जाधव | Updated: September 24, 2022 07:56 IST

विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न: माडखोल येथील प्रकार 

सावंतवाडी : फी न दिल्याच्या रागातून शाळेच्या प्रशासकीयअधिकार्‍याकडून हीन वागणूक मिळाल्याच्या नैराश्यातून माडखोल येथील एका महाविद्यालयाच्या विदयार्थ्याने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र वेळीच हा प्रकार घरातील व्यक्तीच्या लक्षात आल्यामुळे त्याला छप्पराची कौले काढून वाचविण्यात यश आले हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी माडखोल येथे घडला. या प्रकाराची गंभीर दखल ग्रामस्थांसह शिवसेनेकडून घेण्यात आली असून संबधित प्रशासकीय अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

माडखोल येथे एक महाविद्यालय आहे. त्या ठिकाणी गावातील स्थानिक विद्यार्थी दुसर्‍या वर्षासाठी शिक्षण घेत होता. त्याने गेले काही महिने फी भरली नव्हती. त्यामुळे संबधित महाविद्यालयच्या प्रशासकीय अधिकार्‍याने फी साठी त्याच्याकडे तगादा लावला होता. तसेच वारंवार फी न दिल्यामुळे त्याला तुम्ही गरीब आहात, भिकारी होता, तर एवढे महागडे शिक्षण कशासाठी घेत होता, असा प्रश्न करून त्या युवकाला त्रास दिला जात होता.आज सकाळी सुध्दा असाच प्रकार घडला. यावेळी मानसिक नैराश्य आल्यामुळे त्या युवकाने आई-बाबा मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून ठेवत आपल्या घरातील पडवीत साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा प्रकार करण्यापुर्वी चिठ्ठी दरवाजावर चिकटवली होती. त्यामुळे घरातील व्यक्तीच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करून  त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा तोडण्यास ते असमर्थ ठरले. यावेळी छप्पराची कौले काढुन त्याला वाचविण्यास यश आले.

या प्रकाराने भयभीत झालेल्या घरातील व्यक्तीसह शेजार्‍यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत या प्रकारा विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. झालेला प्रकार हा योग्य नाही, काही झाले तरी संबधित प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच संबधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ व बाळा गावडे यांनी केला. या प्रकारानंतर  राऊळ म्हणाले, असा प्रकार होणे दुर्दैवी आहे, पुन्हा घडल्यास संबधित संस्थेला टाळे ठोकू असा इशाराही  त्यांनी यावेळी दिला आहे.

टॅग्स :SchoolशाळाSawantwadiसावंतवाडीEducation Sectorशिक्षण क्षेत्र