शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा गोव्यातील एकही बस फिरू देणार नाही

By admin | Updated: March 18, 2017 23:31 IST

प्रितेश राऊळ यांचा इशारा : चालक-वाहकांना मारहाणप्रकरणी कारवाई करा

वेंगुर्ले : येथील आगारातून पणजीला जाणाऱ्या बसला तेथे अडवून, चालक-वाहकांना मारहाण व बसचे नुकसान केल्याची घटना निंद्यनीय आहे. याबाबत येत्या आठ दिवसात कायदेशीर कारवाई न केल्यास गोव्यातील एकही बस तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रितेश राऊळ यांनी दिला.याप्रश्नी लवकरच मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार करणार असून अशा घटनांना आवर घालण्यासाठी सिंधुदुर्ग आणि पणजी या जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक यांची संयुक्त बैठक घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सिंधुदुर्ग एस. टी. महामंडळाचे कणकवली विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी दिले. वेंगुर्ले एस. टी. आगाराच्या सायंकाळी पणजीला जाणाऱ्या बसला पणजी येथे अडवून बसच्या चालक-वाहकांना मारहाण करण्यात आली. तसेच गाडीच्या दर्शनी भागाची काच फोडून एस. टी. महामंडळाचे नुकसानही करण्यात आले. हा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला. असे प्रकार सातत्याने होत असल्यामुळे सिंधुदुर्गातील विशेषत: वेंगुर्ले आगारातील एसटी चालक आणि वाहक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेला चार दिवस उलटले तरी वेंगुर्ले एस. टी. आगाराकडून कोणतीही कारवाईची मोहीम हाती घेण्यात न आल्यामुळे वेंगुर्ले तालुका युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी वेंगुर्ले एसटी आगार व्यवस्थापक यांच्या केबिनमध्ये एसटी महामंडळाचे कणकवली विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, राहुल गावडे, तुषार साळगावकर, भूषण सारंग उपस्थित होते. यावेळी राऊळ यांनी हसबनीस यांचे लक्ष वेधताना, गोव्यातील खासगी बसचालकांकडून असे प्रकार केले जातात. तीन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. त्यांच्यामुळे प्रशासन, प्रवासी, नागरिक सर्वच हतबल झाले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी एसटी महामंडळाकडून कडक उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर बाबली वायंगणकर यांनी असे प्रकार घडत असतील तर गोव्यातील एकही बस सोडणार नाही, याची दखल महामंडळ व पोलीस प्रशासनाने घ्यावी. सध्या अधिवेशन सुरु असून, याप्रश्नी आमदार नीतेश राणे यांच्यामार्फत याविषयी अधिवेशनात आवाज उठविण्यात येईल, असेही सांगितले.यावेळी कणकवली विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी गोव्यात घडलेला प्रसंग दुर्दैवी असून या प्रकरणात वरिष्ठ कार्यालयाला कळवून पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाईल. त्याशिवाय एसटी महामंडळाकडून गोवा गृहमंत्री, पणजी पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन बैठक घेतली जाईल व तोडगा काढू, असे आश्वासन युवक काँग्रेसला दिले. घटनेला चार दिवस होऊनही पालकमंत्र्यांनी दखल घेतली नसून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्हावासियांतून नाराजी व्यक्त होत आहे. येत्या आठ दिवसात याप्रश्नी कारवाई न झाल्यास गोव्यातील रोखण्यात येतील, असा इशारा प्रितेश राऊळ यांनी दिला. गोव्यातील या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांना तीन तास ताटकळत थांबून रहावे लागले. त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याचे औदार्यही वेंगुर्ले आगारकडून केले गेले नाही. ही बाब दुर्दैवी आहे. त्यामुळे असा प्रकार झाला तर तालुका काँग्रेसमार्फत आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. (प्रतिनिधी)वेंगुर्ले एसटी आगारामध्ये कणकवली विभाग नियंत्रक हसबनिस यांच्याशी प्रितेश राऊळ यांनी चर्चा केली. यावेळी बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, राहुल गावडे आदी उपस्थित होते.