शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

अन्यथा २६ जानेवारीला आंदोलन

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

आचरा ग्रामसभेत ठराव : देवस्थान जमिनप्रश्नी न्यायाची मागणी

आचरा : आचरा गावच्या जमिनींच्या सात-बारावरील वरिष्ठ धारणकर्ता म्हणून श्री देव रामेश्वर हे नाव कमी करून सात-बारा हा पूर्ववत करावा, अशी मागणी १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत करण्यात आली होती. परंतु आजमितीपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत शासनाने याबाबत निर्णय १० जानेवारीपर्यंत न दिल्यास २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांसमोर निर्णय मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा ठराव आचरा ग्रामसभेत घेण्यात आला.आचरा गावची ग्रामसभा सरपंच मंगेश टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजन गावकर, चंदू पांगे, अवधूत हळदणकर, तृप्ती मिराशी, परशुराम शेटये, जेरोन फर्नांडीस, अनिल करंडो, साक्षी ठाकूर, समीर ठाकूर, अरूण आपकर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.सन १९६४ला फेरफार क्रमांक २५९५ प्रमाणे नंतर सात-बारावर इतर हक्कात देवस्थानला फक्त वसुलीचा अधिकार असा शेरा ठेवण्यात आला होता. २९ मे १९७४ साली परिपत्रकानुसार आचरा फेरफार क्रमांक ३१७३ व गाऊडवाडी फेरफार १४५५ होऊन वरिष्ठ धारण करणारा म्हणून श्री देव रामेश्वर व कनिष्ठधारक यांची नावे दाखल करण्यात आली. ज्या परिपत्रकाने हा बदल झाला. त्याची माहिती तहसील कार्यालयाकडे ग्रामपंचायतीने केली असता उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले. हा गोंधळात टाकणारा बदल महसूल खात्याच्या चुकीच्या फेरबदलाचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. यामुळे आचरा गावच्या जमिनीची खरेदी-विक्री, बिनशेती, बोजा धारण करणे असे व्यवहार बंद पडल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. यामुळेच ग्रामस्थांच्या मागणीमुळे १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत देवस्थानच्या खुद्द मालकीच्या जमिनी सोडून इतर जमिनीच्या सात-बारावरील देवस्थानचे नाव कमी करण्याचा ठराव घेण्यात आला होता. परंतु शासन दरबारी आजच्या दिवसापर्यंत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने आंदोलनाचा मार्ग आचरा ग्रामसभेत घेतला आहे.यावेळी ग्रामसभेत आपले मत मांडताना ग्रामपंचायत सदस्य राजन गावकर म्हणाले, देवस्थानचे नाव सात-बारावरून कमी होणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्रामस्थांच्या जीविताचा हा प्रश्न आहे. देवस्थानचे नाव कमी करणे म्हणजे आम्ही देवाच्या विरोधात नाही. देव रामेश्वराचे हक्क अबाधित राखले जातील, पूर्वी ज्याप्रमाणे ‘इ’ करार होत होते त्याचप्रमाणे ‘इ’ करार व्हावेत, अशी त्यांनी मागणी केली. यावेळी आचऱ्याच्या आठवडा बाजाराची जागा बदलल्यावरून जोरदार चर्चा झाली. गेल्या ग्रामसभेत आचरा आठवडा बाजाराची जागा बदलण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्याची इतिवृत्तात नोंदच नसल्याने सरपंच टेमकर यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले व वेळीच उपाययोजना करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. (वार्ताहर)न्यायालयीन लढा देणारसात-बारावरून देवस्थानचे नाव कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत न्यायालयीन लढाई देण्याचे यावेळी ग्रामसभेत ठरविण्यात आले. यासाठी उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, महसूल न्यायाधिकरण यांच्याकडे न्याय मागण्यासाठी न्यायालयीन लढा चालू करण्यात यावा व त्यासाठी लागणारा खर्च हा ग्रामपंचायतीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राजन गावकर यांनी केली असता ग्रामसभेच्यावतीने मान्य करण्यात आली. न्यायालयीन लढा सक्षम करण्यासाठी ग्रामस्थांमधून ग्रामसभेत एक कमिटी तयार करण्यात आली असून यामध्ये आबा मुणगेकर, अनिल करंजे, जयदीप पांगे, सुभाष नलावडे, सचिन बागवे आदींचा समावेश करण्यात आला आहे.