शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा वेगळा निर्णय

By admin | Updated: June 7, 2014 00:35 IST

परब यांना निवडण्यासाठी बांदवलकर यांचे दबावतंत्र

वेंगुर्र्ले : वेंगुर्ले नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनीष परब यांना नगराध्यक्षपदी निवडून न दिल्यास सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर यांनी दिला आहे. नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असतानाही राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर हे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या मागील निवडणुकीत ठोस निर्णय घेऊ शकले नव्हते. नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी मनीष परब व प्रसन्ना कुबल या दोन्ही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ जून असून प्रसन्ना कुबल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. मनीष परब यांना राष्ट्रवादी पक्षाने व राष्ट्रवादीच्या सर्व नरगरसेवकांनी बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून आणावे. तसे न झाल्यास आपणास पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा समाधान बांदवलकर यांनी दिला आहे. राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांचा आपण कार्यकर्ता असून विलास गावडे यांचा कट्टर समर्थक आहे. परब हे नगराध्यक्षपद चांगल्या प्रकारे सांभाळून ते शहराचा विकास करू शकतात. त्यासाठीच परब हे नगराध्यक्ष होणे गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे नगरपरिषदेवर एका ठराविक घराण्याचीच सत्ता होती. परंतु त्यांनी शहराचा विकास काय केला, हे शहरसावासीयांना ठाऊक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपक्ष मजबूत करायचा असल्यास परब यांना नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून देणे गरजेचे आहे. अन्यथा आपणास सभापतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा बांदवलकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे. (प्रतिनिधी)