शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

अन्यथा शालेय क्रीडा स्पर्धा बंद करा

By admin | Updated: January 10, 2015 00:11 IST

बांधकाम समिती सभा : जखमी स्पर्धकांवर उपचाराची मागणी

सिंधुदुर्गनगरी : शालेयस्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेत काही स्पर्धक जखमी होतात. मात्र त्या जखमी स्पर्धकांवर उपचार केले जात नाहीत. त्यामुळे असे स्पर्धक जखमी झाले तर येणारा ओषध व दवाखान्याचा खर्च जिल्हा परिषदेने द्यावा अन्यथा या स्पर्धाच बंद कराव्यात अशी मागणी सदस्यांनी बांधकाम समिती सभेत केली.जिल्हा परिषद बांधकाम समिती सभा सभापती संजय बोंबडी यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी सदस्य एकनाथ नाडकर्णी, दिप्ती पडते, रुक्मीणी कांदळगावकर, सदा ओगले, भगवान फाटक, पंढरीनाथ राऊळ, आत्माराम पालयेकर, समिती सचिव तथा बांधकाम अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सदस्यांना अधिकारच नसतील तर केवळ सभेला तरी का यावे? असा सवाल पंढरी राऊळ यांनी केला. त्यामुळे यापुढे समितीमध्ये कामांना मंजूरी घ्यावी व त्या-त्या कामांचा आढावा घ्यावा अशीही मागणी या सभेत सदस्यांनी केली. प्राथमिक शाळांतून जिल्हास्तरावर येणाऱ्या विद्यार्थी, खेळाडूंना दुखापत झाल्यास येणारा औषध व दवाखान्याचा खर्च जिल्हा परिषदेने घ्यावा अन्यथा या स्पर्धाच बंद कराव्यात अशी मागणी करण्यात आली.इतिवृत्त उशिरा दिल्याने बांधकाम विभागाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी कार्यकारी अभियंता यांनी सभागृहाची माफी मागितली. यावरही नाराजी व्यक्त करत ही बाब दुर्दैवी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तसेच चौकुळ रस्त्याबाबत चुकीची माहिती लिहीली गेली तसेच प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला १ कोटी ६0 लाखाची कामे द्यावीत असे झालेले टिपण ही बाब गंभीर असून यापुढे परिपूर्ण इतिवृत्तलेखनासाठी दोन कर्मचारी बसविण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)दोषींवर कारवाई करावी : सदा ओगलेदेवगड गटविकास अधिकारी दौऱ्याला किंवा अन्य ठिकाणी जाताना केबिनला कुलूप लावून जातात. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत सह्या थांबतात. तसेच १0-१0 लाखांच्या मोठ्या कामांनाच मंजुरी दिली जाते. २५-२५ योजनेंतर्गत अनेक कामांचे प्रस्ताव मंजुरच केलेले नाहीत, अशा प्रकारे सुरु असलेल्या गैरप्रकाराची चौकशी करुन दोषी आढळल्यास कारवाई प्रस्तावीत करावी अशी मागणी सदा ओगले यांनी बांधकाम सभेत केली.