शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
4
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
5
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
6
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
7
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
8
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
9
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
10
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
11
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
12
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
13
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
14
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
15
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
16
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
17
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
18
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
19
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
20
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्योग आधार नोंदणीसाठी मेळाव्यांचे आयोजन

By admin | Updated: April 15, 2017 13:45 IST

विविध परवाना प्रक्रिया सुलभ

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ : महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकारने अवलंबिलेल्या Ease of Doing Business धोरणांतर्गत उदयोगांशी निगडीत विविध परवाना प्रक्रिया सुलभ करण्यात आल्या असून याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडून दिली जाणारी ज्ञापन स्वीकृती भाग-१ व ज्ञापन स्वीकृती - भाग २ बंद करण्यात आली असून त्याऐवजी उदयोग आधार ज्ञापन आॅनलाईन देण्याची प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. उदयोग आधार ज्ञापन नि:शुल्क असून सदर प्रक्रिया फक्त अस्तित्वात असणा-या उदयोगांनाच लागू आहे. प्रस्तावित उदयोगांना सदरची प्रक्रिया लागू नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत असणा-या उत्पादन तसेच सेवा उदयोगांना उदयोग आधार ज्ञापन स्वीकृती देणेसाठी जिल्हा उदयोग केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालयाकडून दिनांक १८ एप्रिल २0१७ रोजी सकाळी ११.00 वाजता सावंतवाडी सहकारी उद्यमनगर लि., माजगांव, ता. सावंतवाडी यांचे कार्यालय, माजगांव, ता. सावंतवाडी व दिनांक १९ एप्रिल २0१७ रोजी सकाळी ११.00 वाजता पंचायत समिती कार्यालय, कणकवली येथे मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.मेळाव्यास येताना उद्योजकाचे आधार कार्ड (भागिदारी संस्था, खाजगी मर्यादित कंपनी, उत्पादक सहकारी संस्था इ. प्रकरणी प्रमूख भागिदार, व्यवस्थापकीय संचालक,अध्यक्ष इ. पदावरील व्यक्तींचे आधार कार्ड आणावे. ) उद्योजकाचे पॅनकार्ड, उदयोजकांचे नावे स्वंतंत्र पॅनकार्ड घेतले असल्यास सदरचे पॅनकार्ड. जिल्हा उदयोग केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालयाकडून यापूर्वी स्थायी लघू उदयोग नोंदणी, ज्ञापन स्वीकृती भाग-१ अथवा भाग-२ घेतली असल्यास त्याची प्रत. बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोड दर्शविणा-या बँक खाते पुस्तकाच्या पानाची प्रत, आदी कागदपत्रांची मूळ प्रत व प्रत्येकी एक झेरॉक्स प्रत आणवयाची आहेया तालुक्यामध्ये आस्तित्वात असलेल्या व ज्यांना यापूर्वी उदयोग आधार नोंदणी घेतलेली नाही अशा सर्व उत्पादन उदयोगांनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उदयोग केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालयाकडून करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, ए ब्लॉक, दुसरा मजला, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा.