शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्याचे जलव्यवस्थापन समिती सभेत आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 17:54 IST

Zp Sindhudurg : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विंधनविहिरी खोदाईचे काम केले जात असल्याने पाण्याची पातळी घटत चालली आहे. घटत चाललेली पाण्याची पातळी वाढावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात यावी, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासन यांनी सभेत दिले.

ठळक मुद्देरेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्याचे जलव्यवस्थापन समिती सभेत आदेशघटलेली पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल

ओरोस : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विंधनविहिरी खोदाईचे काम केले जात असल्याने पाण्याची पातळी घटत चालली आहे. घटत चाललेली पाण्याची पातळी वाढावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात यावी, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासन यांनी सभेत दिले.जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाइन झाली. यावेळी समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती महेंद्र चव्हाण, अंकुश जाधव, शेरवानी गावकर, सदस्य मायकल डिसोजा, श्वेता कोरगावकर, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विंधन विहिरींची खोदाई केली जाते. पाण्‍याचा भरमसाठ उपसा केला जातो. त्याचा परिणाम भूगर्भातील पाण्याच्या पातळीवर होत आहे. तरी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात यावी. यासाठी १५ वित्त आयोगाने तरतूद करण्यात यावी याबाबत सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात त्याचे नियोजन करावे, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सभेत दिले.जलसंधारणाच्या कामांचा आराखडा जल व्यवस्थापन समितीसमोर मंजुरीला न ठेवत परस्पर जिल्हा नियोजनाकडे पाठविला गेल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी सुचविलेली महत्त्वाची कामे वगळण्यात आली आहेत, असा आरोप करत जलसंधारणचा वार्षिक कृती आराखडा परस्पर जिल्हा नियोजनकडे कसा गेला ? असा प्रश्न उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत उपस्थित केला. यावर कोणत्याही कामाची यादी अथवा आराखड्याची यादी जल व्यवस्थापन समिती सभेत ठेवल्याशिवाय परस्पर मंजुरीसाठी जिल्हा नियोजनकडे पाठवू नये, असा ठराव घेण्यात आला....तर व्याजासहित रक्कम भरून घेणारदेवगड विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी योजनेची तब्बल ६३ लाख ५८ हजार रुपये एवढी पाणीपट्टी थकीत आहे. त्यामध्ये विजयदुर्ग योजनेची १३ लाख ५८ हजार तर देवगड नळयोजनेची ५० लाख रुपये एवढी पाणीपट्टी थकीत आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना नोटीस बजावण्यात आले आहेत. यातील काही ग्रामपंचायतींकडे ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरली आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायतींनी ती जिल्हा परिषदेकडे भरणा केलेली नाही, अशा काही ग्रामपंचायती असल्याची चर्चा सभागृहात सदस्यांनी केली.

यावर मात्र ज्या ग्रामपंचायतींकडे पूर्ण पाणीपट्टी वसूल झाली आहे. मात्र, त्यांनी ती जिल्हा परिषद भरली नाही अशा ग्रामपंचायतींकडून व्याजासहित पाणीपट्टी भरून घेतली जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सभेत दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग