शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कृषि व्यावसायिक अभ्यासक्रमात बारावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 14:25 IST

राज्यात बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी संधी मिळणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी पाठपुरावा केला होता.

ठळक मुद्देकृषि व्यावसायिक अभ्यासक्रमात बारावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधीकृषि शिक्षण व संशोधन परिषदेचा निर्णय, निरंजन डावखरे यांचा पाठपुरावा

सिंधुदुर्ग : राज्यात बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी संधी मिळणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी पाठपुरावा केला होता.राज्यात बारावीच्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) 23 ऑगस्ट रोजी निकाल लागला. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेशप्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते.

https://www.lokmat.com/sindhudurga/give-students-chance-pass-xii-exam-agricultural-vocational-course/

या प्रश्नासंदर्भात आमदार निरंजन डावखरे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर कृषी व पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना निवेदन दिले होते. तसेच फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी केली होती.

या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, यासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला होता. या संदर्भात प्रधान सचिव डवले यांच्याबरोबरच महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, शिक्षण संचालक कौसडीकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेने काल राज्यातील चार कृषि विद्यापीठात प्रवेशप्रक्रिया पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राहूरी, अकोला, परभणी आणि दापोली येथील कृषी महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.

व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची यादी उद्या गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ३ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करता येतील.

४ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या प्रवेश अर्जांची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ९ ऑक्टोबरपासून प्रवेश फेरीला सुरुवात होईल. संस्थास्तरीय कोट्यातील रिक्त जागा संबंधित महाविद्यालयस्तरावर भरण्यासाठी ११ ऑक्टोबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालNiranjan Davkhareनिरंजन डावखरेsindhudurgसिंधुदुर्ग