शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सुसंधी अन् अत्यावश्यक

By admin | Updated: September 20, 2015 23:40 IST

कृषी पर्यटन : पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद

प्रथमेश गुरव-- वेंगुर्र्ले  --‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना तशी परदेशी आहे. आॅस्ट्रेलिया व अमेरिका यासारख्या प्रगत देशात बऱ्यापैकी रुजलेली आहे. तेथील शेतकऱ्यांबरोबरच त्या देशाच्या उत्पन्नालाही हातभार लावणारी आहे. त्यामुळेच तेथील शासनही या उपक्रमाला प्रोत्साहन देते. आपल्या देशात ही संकल्पना नवीन असूनही जेथे कृषी पर्यटन प्रकल्प आहेत, त्यांना पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज शहरी मंडळींसाठी ग्रामीण जीवन हा कुतूहलाचा विषय झाला आहे. प्रगत देशातील कृषी पर्यटन हे फक्त ‘कृषी’ पुरतेच मर्यादित असूनही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. फळांनी बहरलेल्या झाडावरुन स्वत: हातांनी फळे तोडणे, त्याचा आस्वाद घेणे, भाजीपाला स्वत: काढणे, प्राणी पाहणे, बैलगाडीतून शेतात फेरफटका मारणे इत्यादी उपक्रम मोठ्या कल्पकतेने राबविले जातात. आपल्या देशात मात्र अजूनही शेती हा ग्रामीण जीवनाचा कणा आहे. येथील सर्व व्यवहार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीशी निगडीत असतात. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीलाही शेतीचेच अधिष्ठान लाभले आहे. त्यामुळे आपल्या देशात कृषी पर्यटन हे शेतीबरोबरच ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविते.भारताची ओळख खेड्यांचा देश अशी आहे. येथील जनता शेती व शेतीसंलग्न व्यवसायावर अवलंबून असल्याने शेती ही ग्रामीण भारताची संस्कृती आहे. परंतु, आज शेती व्यवसायापुढे अनेक अडचणी व आव्हाने उभी आहेत. शहरीकरणावर दिलेला भर, जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल, हवामानातील अनिश्चितता या सर्वांचा परिणाम शेतीवर झालेला आहे.वाढीव उत्पादन खर्च व शेतमालाची कमी किंमत यामुळे शेतीचे आर्थिक गणित जमेनासे झाले आहे. पण या समस्यांबरोबरच या क्षेत्रात काही नवीन संधीही उपलब्ध होत आहेत. ‘कृषी पर्यटन’ ही त्यापैकीच एक संधी आहे. कृषी पर्यटन व्यवयाय एकंदरीतच जगभर वाढत आहे. विरंगुळा आणि नवनवीन अनुभूती घेण्यासाठी देशाटन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचा फायदा आपल्या देशालाही मिळत आहे. पर्यटन हा शेती खालोखाल मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. त्यामुळे वाढत्या पर्यटन व्यवसायाबरोबरच रोजगाराच्या मोठ्या संधीही उपलब्ध होत आहेत. काही शेतकरी हा उपक्रम राबवित आहेत. निसर्ग सौंदर्यात भर टाकणाऱ्या शेती व बागा, आपली स्वतंत्र ओळख आधीच निर्माण केलेले ग्रामीण खाद्यपदार्थ याचा त्यांनी भांडवल म्हणून वापर केला आहे. कृषी पर्यटनाद्वारे तेथील लोकजीवन व आदरातिथ्य याचा परिचयही पर्यटकांस करुन देत आहेत. या व्यवसायातून शेतकऱ्यांबरोबरच अनेकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उत्पन्न मिळत आहे. कोकणाचा विचार करता येथे येणाऱ्या पर्यटकांचे कोकणचे समुद्रकिनारे हे मुख्य आकर्षण आहे. येथील नारळी, पोफळीच्या, आंबा, काजूच्या बागांनी, वनश्रीने नटलेल्या कोकणच्या निसर्गसौंदर्याने मोलाची भर टाकली आहे. कृषी पर्यटन ही एक अशी संकल्पना आहे की, ज्यामध्ये शेती क्षेत्राशी संबंधित उद्योग उत्पादने आणि कारभाराचा पर्यटन अनुभूतीशी संगम साधण्यात आला. कृषी क्षेत्रात नवनवीन प्रकल्पाची उभारणी करणे, उद्योग, शेती, फुलबागा उत्पादन प्रक्रिया इत्यादी ठिकाणी भेट सहली, शेतीवर आधारीत निवास आदी सुविधांपासून ते बैलगाडी प्रवासापर्यंत कृषी व ग्रामीण संस्कृतीशी संबंधित विविध अनुभव घेण्याची संधी या कृषी व ग्र्रामीण पर्यटनरुपाने पर्यटकांना उपलब्ध करुन देता येते.कृषी पर्यटनालाही फायदा होणार आहे. परदेशी पर्यटकांमुळे शासनाला परकीय चलन मिळू शकते. पर्यटन व्यवसायातून कराच्या माध्यमातून शासनाला चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. पर्यटनाच्यादृष्टीने होणाऱ्या या विकासाचे केंद्रीकरण टाळले पाहिजे. पर्यायाने माथेरान, महाबळेश्वर, गणपतीपुळेसारखी पर्यटन ठिकाणे सिमेंटची होणार नाहीत. गावातच रोजगार मिळाल्याने मुंबईसारख्या शहरातील वाढत्या शहरीकरणाचा प्रश्न सुटू शकतो. लोककला, संस्कृती यांच्या संवर्धनासाठी वेगळा निधी लागणार नाही.