शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विकासनिधीवर फक्त जनतेचाच अधिकार -विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 18:38 IST

वैभववाडी : रस्ते, पाणी याशिवाय आवश्यक पायाभूत सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. विकासनिधी जनतेचा असून या निधीवर सर्वस्वी जनतेचाच अधिकार असतो.

ठळक मुद्देश्री आदिष्टी देवी मंदिर आवारात बसविलेल्या हायमास्टचे लोकार्पण

वैभववाडी : रस्ते, पाणी याशिवाय आवश्यक पायाभूत सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. विकासनिधी जनतेचा असून या निधीवर सर्वस्वी जनतेचाच अधिकार असतो. त्यामुळे जनतेला अपेक्षित कामेच या निधीतून झाली पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे लोकोपयोगी कामांची निवड करून ती पूर्ण करण्याला प्राधान्य देत आहोत, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी खांबाळे येथे केले.खांबाळे येथील श्री देवी आदिष्टी मंदिर परिसरात खासदार निधीतून उभारलेल्या हायमास्टचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कणकवली विधानसभाप्रमुख शैलेश भोगले, नागेंद्र परब, तालुकाप्रमुख मंगेश लोके, रमेश तावडे, नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे, सरपंच संचिता गुरव, उपसरपंच लवू साळुंखे, बबन पवार, सूर्याजी पवार, सुनील पवार, शांताराम कदम, अशोक पवार, संजय साळुंखे, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले की, विकासनिधीवर फक्त जनतेचाच हक्क असतो. त्यामुळे तुम्ही फक्त विकासकामे सूचवा. ती मार्गी लावण्याचे काम आमचे आहे. तळागाळापर्यंत विकास पोहोचविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. येथील शेतकºयांच्या आंबा, काजूला चांगला दर मिळाला पाहिजे. काजूला चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी काजू बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. काजू बोर्डाला निधी मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अधिकाधिक समस्या मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा विकासाकरीता आणलाआहे. त्यामुळे जिल्ह्यात विकासाला गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शैलेश भोगले यांनी मनोगत व्यक्त केले. श्री आदिष्टी देवी देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष बबन पाटील यांच्या हस्ते खासदार राऊत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.ऊस संशोधन केंद्रासाठी प्रयत्नशील!वैभववाडी तालुक्यातील शेतकरी ऊस शेतीकडे वळला आहे. तालुक्यात ऊस कारखाना झाला असता तर ऊसाचे क्षेत्र आणखी वाढले असते. परंतु दोघांच्या भांडणामुळे कारखाना होऊ शकला नाही. ऊसशेतीची शास्त्रीय माहिती मिळावी या हेतूने ऊस संशोधन केंद्र होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.खांबाळे येथील श्री आदिष्टी देवी मंदिराच्या आवारात बसविण्यात आलेल्या हायमास्टच्या उद्घाटनानंतर खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.