शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी विकत देण्याच्या बहाण्याने आॅनलाईन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 18:01 IST

खारेपाटण येथील युवकाला दुचाकी विकत देतो असे सांगून एका भामट्याने ५१,६०० रुपयांना आॅनलाईन गंडा घातला आहे. याबाबत त्याने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

ठळक मुद्देदुचाकी विकत देण्याच्या बहाण्याने आॅनलाईन गंडाखारेपाटण येथील युवकाची फसवणूक : ५१,६०० रुपये केले लंपास

कणकवली : खारेपाटण येथील युवकाला दुचाकी विकत देतो असे सांगून एका भामट्याने ५१,६०० रुपयांना आॅनलाईन गंडा घातला आहे. याबाबत त्याने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.खारेपाटण कर्लेवाडी येथील सूरज दामाजी गुदळे (२३) या युवकाने ३१ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोबाईलमध्ये फेसबुकवर जुनी दुचाकी विकायची असल्याची एक जाहिरात पाहिली. त्याला गाडीची गरज असल्याने त्याने संबंधित जाहिरातीमधील (एम.एच.०९, इबी-०६११) या क्रमांकाच्या दुचाकीवर क्लिक केले.जाहिरातीमध्ये त्या दुचाकीची किंमत २०,१०० रुपये इतकी होती. त्यानंतर जाहिरात देणाऱ्याने मेसेंजरवर सूरज याला त्याचा मोबाईल नंबर पाठविला. त्यावर सूरज याने लगेच संपर्क केला. मात्र, त्यावेळी त्या व्यक्तीने फोन घेतला नाही. सायंकाळी ४.०७ वाजण्याच्या सुमारास सूरज याला फोन करून हिंदीतून संवाद साधला. त्यावेळी गाडीची किंमत २०,००० रुपये सांगितली. परंतु सूरज याने १५,००० रुपयाला दुचाकी मागितली. त्यानंतर त्या व्यक्तीने दुचाकीचे कागदपत्र व्हॉट्सअ‍ॅपवर टाकले. त्यात गणेश खामकर असे नाव नमूद होते.त्यानंतर त्या व्यक्तीने गाडीसाठी ३,००० रुपये अ‍ॅडव्हान्स पाठवा असे सांगून गुगल पे वर मेसेज केला. सूरज याने पैसे पाठविल्यावर वाहतूक खर्च म्हणून २,००० रुपये पाठवा असे सांगितले. सायंकाळी ६.११ वाजता २००० रुपये पाठविले. तसेच त्यांना फोन करून गाडी केव्हा पाठविणार असे सूरज याने विचारले. त्यावेळी उद्या सकाळी १० वाजता गाडी येणार असे त्याने सांगितले .त्यानंतर २ सप्टेंबर रोजी सकाळी ८.५२ वाजता फोन करून हिंदीतून आर्मी पोस्टमन बोलतोय. वारगावजवळ आलो आहे, असे सांगितले. तसेच तुमचे पार्सल लॉगीन करण्यासाठी उरलेले १०,००० रुपये पाठवा असे सांगितले. सकाळी ९.१२ वाजता १०,००० रुपये सूरज याने पाठविले. त्यानंतर त्याला पुन्हा आर्मी पोस्टमनचा फोन आला. त्याने पुन्हा सोकोटो चार्जेस ९,१५० रुपये भरावे लागतील. त्यातील ५० रुपये कट होतील. तसेच ९,१०० रुपये गाडी दिल्यानंतर जागेवर परत करतो, असे सांगितले. त्यामुळे परत पैसे पाठविले.टप्प्याटप्प्याने ५१ हजार पाठविलेटप्प्याटप्याने ५१ हजार ६०० रुपये गुगल पेने पाठविले. मात्र, दुचाकी काही मिळाली नाही. त्यामुळे सूरज याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलीस ठाण्यात येऊन त्याबाबत तक्रार नोंदविली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :fraudधोकेबाजीsindhudurgसिंधुदुर्ग