शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

बालविकासचा एक टक्का निधी खर्च

By admin | Updated: December 7, 2015 00:20 IST

योजनांची मंजुरी लांबणीवर : आठ महिन्यांत ८४ लाखांपैकी ६0 हजार खर्च

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद अर्थसंकल्पीय निधीतून जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेल्या ८४ लाख ६ हजार ४०० रुपये निधीपैकी गेल्या आठ महिन्यांत केवळ (एक टक्का) ६० हजार रुपये निधीच खर्च झाल्याची बाब उघड झाली आहे. खर्च झालेला निधी समुपदेशनावर खर्च झाला आहे, तर विविध योजनांचे प्रस्ताव व मंजुरी महिला बालविकास समितीकडून लांबणीवर पडल्याने योजनांचा निधी अद्यापही अखर्चित असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय निधीतून महिला बालविकास विभागाला विविध योजनांसाठी सन २०१५-१६ साठी ८४ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीपैकी ५० टक्के निधी विविध प्रशिक्षणांवर, तर ५० टक्के निधी विविध लाभाच्या योजनांवर खर्च करायचा आहे. यामध्ये मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणासाठी १८ लाख, महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे १ लाख ४५ हजार, सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी ११ लाख ७१ हजार ४०० रुपये, अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत भाडे तीन लाख, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुरस्कार देणे २ लाख ९० हजार, महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा दौरा कार्यक्रम एक लाख, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दोन लाख, दुर्धर आजारी मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी अर्थसाहाय्य दोन लाख, अंगणवाड्यांना साहित्य पुरविणे नऊ लाख, कुपोषित मुले, किशोरवयीन मुले, गरोदर, स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार पुरविणे पाच लाख, पिठाची गिरण (घरघंटी) पुरविणे १५ लाख, सौरकंदील चार लाख, पिको फॉल शिलाई मशीन पुरविणे सहा लाख, सायकल पुरविणे सहा लाख अशी तरतूद विविध योजनांवर करण्यात आली आहे. या विविध योजनांसाठी जिल्हाभरातून लाभार्थ्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत मात्र अद्यापही विविध योजनांच्या प्रस्तावांना मंजुरी न मिळाल्याने निधी खर्चाची अडचण निर्माण झाली आहे.निधी खर्चाच्या दृष्टीने वेळीच प्रस्ताव घ्या अशी वारंवार सूचना महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून प्रत्येक सभांमध्ये केल्या जात होत्या. त्यानुसार काही योजनांना प्रस्तावही प्राप्त झाले आहेत. मात्र, प्रस्ताव मंजुरी लांबणीवर पडल्याने निधी अखर्चित राहिल्याचे समोर येत आहे. गेल्या आठ महिन्यांत ८४ लाख निधीपैकी केवळ ६० हजार रुपयेच एवढा निधी खर्च झाला आहे, तर उर्वरित ८३ लाख ४० हजार निधी खर्चाचा डोंगर येत्या काही महिन्यांत पार पाडण्याचे आव्हान महिला व बालविकास विभागाला स्वीकारावे लागणार आहे. (प्रतिनिधी)लाभार्थींच्या यादी मंजुरीस टाळाटाळसन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील गेल्या आठ महिन्यांत विविध सभा महिला व बालविकास सभापती स्नेहलता चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. काही सभांमध्ये प्रस्ताव मंजुरी आणि साहित्य खरेदीबाबत वादग्रस्त चर्चाही झाल्या. सदस्यांमधून अधिकाऱ्यांवर आरोपही झाले. खरेदी करण्यात येणाऱ्या साहित्याचे सँपल (मॉडेल) बघण्याचा कार्यक्रमही पार पडला. तरीही लाभार्थीच्या यादीला मंजुरी देण्यास या समितीकडून वारंवार टाळण्याचे प्रकार घडले. या एकूणच कारभारामुळे अद्यापही महिला बालकल्याण विभागाच्या योजनांवरील निधी अखर्चित राहिल्याचे चित्र समोर येत आहे.