शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात एक लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे सुरु : मुख्यमंत्री

By admin | Updated: June 24, 2017 18:01 IST

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरण भूमीपूजन

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. २४: दळणवळणाच्या पायाभूत सुविधा रस्ते विकासासाठी आवश्यक आहेत, त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकारने कोकणात पायाभूत सुविधांची १ लाख कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. नियोजनपूर्वक व कालबध्द रितीने होत असलेल्या या कामामुळे येत्या दोन वर्षात कोकणचा कायापालट होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कुडाळ येथे केले. केंद्र सरकारच ेरस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचा भूमीपूजन समारंभ कुडाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्?यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते, तर प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, महसूल वसार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालकमंत्री दीपक केसरकर, बंदरे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, रश्मी ठाकरे उपस्थित होते.कोकणातील निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण करुन निसर्गाला मान्य असलेला विकास करुन कोकणवासीयांची प्रगती आणि उन्नती साधण्यास राज्य शासनाने सर्वोच प्राधान्य दिल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, कोकणामध्ये निसर्ग, समुद्रकिनारा चांगला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. पर्यटनाला अधिक वाव मिळावायासाठी पंचतारांकित हॉटेल निर्मितीबरोबरच विमानतळ विकासासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे.राज्य व केंद्र शासन कोकणच्या विकासासाठी अधिक संवेदनशील असून कोकणचा विकास परिवर्तन आणि पर्यटन या गोष्टीस प्राधान्य दिले आहे. कोकणातील छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी चांदा ते बांदा या योजनेला गती दिली जाईल अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली.ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. या जिल्ह्यात पर्यटन वाढावे यासाठी केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शनमध्ये प्रस्ताव पाठविला असून केंद्रव राज्य शासनाच्या माध्यमातून टुरिस्ट सर्किट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कोकणवासीयांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभेअसून कोकणच्या सर्वागिण विकासासाठी ज्या-ज्या गोष्टी कराव्या लागतील,त्या-त्या प्राधान्यक्रमाने केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.कोकणात रस्ते, रेल्वे आणि बंदर विकासाचे महत्वकांक्षी प्रकल्प राबवून नव नव्या उद्योगाबरोबरच पर्यटन विकासाला अधिक चालना देवून रोजगार निर्मिती करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, रेल्वे व रस्ते विकासाच मोठे जाळे निर्माण करुन दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षात अडीच पटीने केले आहे. मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे कोकणवासियांचे, लोकप्रतिनिधीचे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होत असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखून कोकणचा विकास करण्यावर शासनाने अधिक भर दिला आहे. या पायाभूत सुविधामुळे कोकणातील पर्यटन व्यवसाय जगाच्या नकाशावर झळकविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कोकणच्या विकासाकरीता सवार्थाने महत्वाचा असल्याचे स्पष्ट करुन गडकरी म्हणाले, या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपरीकरणासाठी ११ पॅकेज तयार केली असून १४ पुलांची कामे सुरु केली आहेत. या महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल केवळ १६५ दिवसात पूर्ण केला आहे या कामी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी केले. या महामागार्मुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन अनेक लोकांचे प्राण वाचतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिक शेतक-यांना अधिक मोबदला देण्याची तयारी शासनाने ठेवली त्याकरीता कोकणातील तीनही जिल्हाधिका-यांकडे ३१00 कोटी रुपये दिले असून अ‍ॅवॉर्ड होतील तसे मोबदला देण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. येत्या तीन महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २0१८ पर्यंत हा रस्ता पूर्ण केला जाईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.रस्ते, रेल्वे वाहतुकीबरोबरच जलवाहतुकीसही शासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५४ कि. मी. लांबीचे रस्ते चौपदरीकरणचा कार्यक्रम हाती घेतला असून त्यासाठी ४४७0 कोटी ७२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सागरीमागार्तील २३ पैकी १८ पूल बांधले असून उर्वरीत जलमागार्चा विकास केला जात आहे. यामध्ये खाड्या व नद्यांचे जलमार्गात रुपातर करण्यात येत आहे. महाराष्ट्रासाठी जेवढी बंदरे बाधायची असतील त्यांचे प्रस्ताव द्या त्यांना मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कोकणातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पेट्रोल, डिझेल ऐवजी एलएनजी इंधन म्हणून वापरणे उपयुक्त आहे. यापुढे इलेक्ट्रीकल, बायोडिझेल तसेच बायो इथेनॉलला मान्यता देऊन वाहतुक करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, कोकणात रेल्वे, रस्ते आणि बंदराच्या विकासाची कामे हाती घेऊन कोकणचा विकास केला जात आहे. यासाठी आवश्यक सर्व पायाभुत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. रेल्वे विकासापासून दुर्लक्षित असलेल्या भागावर अधिक लक्ष केंद्रीत केले असून कोकणला पश्चिम महाराष्ट्र जोडण्याबरोबर वैभववाडी पासून रेल्वेने बंदरे जोडली जातील यासाठी रेल्वे विभाग प्रयत्नशील आहे. राज्यात विशेष: कोकणात पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटीबध्द असल्याचे ते म्हणाले.शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, कोकणात रस्ते, रेल्वे आणि जलमागार्चे केंद्र आणि राज्य शासनाने महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोकण हे जगातील पर्यटनाचे केंद्र होईल. कोकणाला लाभालेले समुद्र किनारे, गड किल्ले यांच्या विकासाबरोबरच चौपदरीकरणाच्या कामामुळे कोकणच्या पर्यटनाला नवी दिशा मिळेल.केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव अजय संगणे यांनी स्वागतकेले. खासदार विनायकराऊत यांनी प्रास्ताविक केले. समारंभास कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, माजी आमदार प्रमोद जठार,अजित गोगटे यांच्या सह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.