शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन कार खरेदीत एक लाखावर गंडा; एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 17:27 IST

वडाचापाट येथील तरुणाची आॅनलाईन कार खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. माटुंगा-मुंबई येथील राहुल गणेश चव्हाण या कार एजंटने संदेश रामचंद्र कासले यांना १ लाख ३९ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी कासले यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ५ ते ११ डिसेंबर या कालावधीत घडला.

ठळक मुद्देआॅनलाईन कार खरेदीत एक लाखावर गंडा; एकावर गुन्हामुंबईतील संशयित : वडाचापाट येथील तरुणाची फसवणूक

मालवण : वडाचापाट येथील तरुणाची आॅनलाईन कार खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. माटुंगा-मुंबई येथील राहुल गणेश चव्हाण या कार एजंटने संदेश रामचंद्र कासले यांना १ लाख ३९ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी कासले यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ५ ते ११ डिसेंबर या कालावधीत घडला.वडाचापाट बौद्धवाडी येथे राहणाऱ्या संदेश रामचंद्र कासले याने ५ सप्टेंबर रोजी कारवाला डॉट कॉम या अ‍ॅपवरून हुंडाई आय २० ही कार खरेदीसाठी नोंदणी केली. त्यानंतर कार ताब्यात घेण्यासाठी कासले मुंबईत गेले असता राहुल चव्हाण या कार एजंटशी भेट झाली. त्यावेळी चव्हाण याने नोंदणी केलेल्या कारची विक्री झाली आहे, असे सांगत अन्य कारचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवतो असे सांगितले.त्यानंतर त्याने वेगवेगळ्या कारचे फोटो कासले यांना पाठविले. त्यात कासलेना मारुती सुझुकीची इर्टिका कार आवडली. मोबाईलवरून कारचा व्यवहार १ लाख ९५ हजार रुपयांना ठरला. यावेळी चव्हाण याने आपल्या बँक खात्यावर इर्टिका कारसाठी ५० टक्के आगाऊ रक्कम भरण्यास सांगितले. त्यानंतर संदेश कासले याने चव्हाण याच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने १ लाख ३९ हजार रुपये पाठविले.कासले यांनी कार खरेदीसाठी ठरलेली रक्कम चव्हाण याच्या खात्यावर जमा केली. मात्र, त्यांना कार ताब्यात मिळाली नाही. कासले मुंबईत गेल्यावर त्यांना एक धनादेश देण्यात आला. मात्र तो बँकेत वटला नाही. म्हणून ते पुन्हा मुंबईत गेले असता चव्हाण याच्याशी भेट झाली नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मसुरे पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली. याप्रकरणी चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीsindhudurgसिंधुदुर्ग