शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

लाच घेणार नाही.. लाच देणार नाही !, दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली शपथ

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 31, 2022 16:58 IST

यानंतर राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.

सिंधुदुर्ग : शासनाने आजपासून ६ नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवूया’.. ‘लाच घेणार नाही.. लाच देणार नाही’.. अशी शपथ घेतली.जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड उपस्थित होते.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी यावेळी शपथ वाचन केले. आपल्या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडथळा आहे, असे मला वाटते.भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सरकार नागरिक आणि खासगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटितपणे काम करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. प्रत्येक नागरिकाने दक्ष रहायला पाहिजे. आणि सदैव प्रामाणिकपणा व सचोटी यांच्या उच्चतम मानकांप्रती वचनबद्ध असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी साथ दिली पाहिजे. याची मला जाणीव आहे.म्हणून मी प्रतिज्ञा घेतो की, ‘जीवनाच्या सर्वक्षेत्रांत सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही. सर्व कामे प्रामाणिकपणाने आणि पारदर्शक पद्धतीने करेन. जनहितासाठी कार्य करेन व्यक्तिगत वागणुकीत सचोटी दाखवून उदाहरण देईन, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन’.यानंतर राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदेशाचेही वाचन करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, नायब तहसिलदार दर्शना चव्हाण यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCorruptionभ्रष्टाचार