शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पिढीजात पायवाटच अडविली

By admin | Updated: February 15, 2015 23:43 IST

आयी हरिजनवाडीतील प्रकार : शेकडो ग्रामस्थांची तहसील कार्यालयात धाव

दोडामार्ग : आयी हरिजनवाडीत जाणारी पिढीजात पायवाट काही ग्रामस्थांनी अडविल्याने त्या वाडीतील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने वारंवार त्या ग्रामस्थांना समज देऊनही तसाच प्रकार घडत राहिल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी शुक्रवारी दोडामार्ग तहसीलदार संतोष जाधव यांची भेट घेतली. यावेळी जाधव यांनी सोमवारी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय दिला जाईल, असे सांगितले.निवेदनात म्हटले की, सन २00७ मध्ये सदानंद चव्हाण, देवानंद चव्हाण यांनी सर्व्हे नंबर ९३६ मध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे तीन मीटर रुंद व ४५ मीटर लांब एवढा रस्ता वाहतुकीस खुला केला होता. या रस्त्याची नोंद २00७ पूर्वीपासून २६ नंबरमध्ये होती. हा रस्ता आयी दलित वस्तीसाठी होता. तेथील लोकसंख्या सुमारे २५0 एवढी आहे. रस्त्याचे डांबरीकरण करीत असताना वरील प्रतिज्ञापत्र करणारे चव्हाण कुटुंबीय अडथळा निर्माण करीत आहेत. यावेळी भरत जाधव यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे सदस्य एकनाथ नाडकर्णी, पंचायत समिती सदस्य जनार्दन गोरे, लाडू जाधव, विष्णू जाधव, साजन जाधव, सावित्री जाधव, शोभावती जाधव, पांडुरंग जाधव, गंगाराम जाधव, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)चव्हाण कुटुंबीयांकडून अडवणूकआतापर्यंत फक्त दहा मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे; परंतु उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण करीत असताना वरील प्रतिज्ञापत्र करणारे चव्हाण कुटुंबीय अडथळा निर्माण करीत आहेत. हे कुटुंबीय पूर्वीच्या ठिकाणाहून वाट न देता दुसरीकडून न्या असे सांगत पूर्वीची वाट बंद करावयास लावली. त्यावेळी गावचे सरपंच प्रज्योती एकावडे व पोलीसपाटील गजानन एकावडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सध्या वाट पूर्णपणे बंद केली आहे व दिलेला रस्ताही बंद करण्यासाठी जोरदार भांडणतंटा करतात.