शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालेल्या ग्लेनचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त, व्हिसेरा राखून ठेवला

By अनंत खं.जाधव | Updated: May 9, 2023 19:17 IST

पोलीस सर्व घटनेची सखोल चौकशी करणार

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद च्या स्विमिंग पूलमध्ये बुडून ग्लेन जाॅन डिसोजा यांचा मृत्यू होऊन दोन दिवस उलटले तरी अद्याप पोलीसाचा तपास धिम्यागतीने सुरू आहे.ग्लेन याच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलीसांना प्राप्त झाला असून प्रथम दर्शनी बुडून मृत्यू झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.दरम्यान व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून पोलीस हा व्हिसेरा उच्चस्तरीय तपासणी साठी पुणे येथे पाठवणार आहेत.अशी माहीती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली तसेच या प्रकरणी जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याचे ही अधिकारी म्हणाले.सावंतवाडी नगरपरिषद च्या स्विमिंग पूलात रविवारी एक ग्लेन डिसोजा हा युवक बुडून मृत पावला या घटनेला दोन दिवस उलटले तरी अद्याप पर्यंत पोलीसांकडून चौकशीस सुरू आहे.या मध्ये ग्लेन च्या वडिलांनी संशय व्यक्त केल्यानंतर ही पोलीसांनी वेगाने पाऊले उचलण्यात आली नाहीत.या प्रकरणात अद्याप पर्यत कोणाचेही जाबजबाब नोंदवण्यात आले नाही.किंवा कागदपत्र तपासण्यात आली नाहीत ज्याला नगरपरिषद कडून ठेका देण्यात आला होता.त्या ठेकेदाराकडून देण्यात आलेली कागदपत्र योग्य आहे का हे ही पोलीसांनी तपासले नसल्याचे पुढे आले आहे.ग्लेन याचा मृत्यू बुडून झाला असे शवविच्छेदन अहवालात म्हटले असले तरी पोलीसांकडून व्हिसेरा राखून ठेवत तो पुणे येथील वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे.असे यावेळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले. पोलीस सर्व घटनेची सखोल चौकशी करणार आहेत.आणि पोलीसांकडून अक्समृत्यूचा कधीही तपास करता येतो असे ही स्पष्ट केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग