शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारास मालवणात विरोध

By admin | Updated: July 6, 2014 23:18 IST

महिला बचतगटांनी नगराध्यक्षांची घेतली भेट

मालवण : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नागरी भागात पोषण आहार पुरवठा करण्यासाठी स्वारस्याच्या अभिव्यक्ती प्रक्रियेस मालवण शहरातील महिला बचतगटांनी विरोध दर्शविला आहे. शहरातील शाळांमध्ये पोषण आहार पुरविण्याचे काम करणाऱ्या बचतगटांच्या महिला प्रतिनिधींनी शनिवारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची भेट घेऊन अभिव्यक्ती प्रक्रियेस विरोध दर्शविण्यासाठी पाठिंब्याची मागणी केली.शिक्षण विभागास प्राप्त झालेल्या परिपत्रकात म्हटले आहे, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्वारस्याच्या अभिव्यक्ती प्रक्रियेतून निवड करण्यात आलेल्या केंद्रीय स्वयंपाकगृहातून सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षामध्ये आहार पुरवठा सुरु होणे अपेक्षित आहे. या केंद्रीय स्वयंपाकगृहातून आहार पुरवठा सुरु होईपर्यंत सध्याच्या कार्यपद्धतीनुसार कार्यरत यंत्रणेमार्फत पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आहार पुरवठा करून घेण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी जुन्या करारनाम्यात मुदतवाढ देताना पुढील आदेश होईपर्यंत फक्त तात्पुरत्या स्वरूपात आहार पुरवठा करण्याबाबतची तरतूद करण्यात यावी.दरम्यान, मालवण गटशिक्षण कार्यालयाने स्वारस्याच्या अभिव्यक्तीचे अर्ज मागविले होते. ही यंत्रणा नियुक्तीबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आल्याचे पत्र केंद्रप्रमुखांना पाठविले आहे. त्यामुळे शहरातील शाळांना पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचतगटांमध्ये खळबळ उडाली आहे. शनिवारी प्रियांका सामंत, अपर्णा देसाई, शुभदा परब, प्रिती साटेलकर, शिवाजी पारकर, सुवर्णा गावडे, श्रद्धा तळवडेकर, प्रमिला मयेकर आदींच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची भेट घेऊन हा आदेश महिला बचतगटांवर अन्यायकारक असल्याचे सांगितले.लोकप्रतिनिधींनी आम्हांला आता पाठिंबा द्यावा. गेली १४ वर्षे आम्ही शाळांना पोषण आहार पुरविण्याचे काम करतो आहोत. पोषण आहाराची जबाबदारी बचत गटांकडेच राहवी. सन २००३ पासून ५० पैसे दरावर आम्ही हे काम करतोय. महिला बचतगटांवरचा अन्याय दूर झालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पंचायत समितीशी संपर्क साधला असता शासनाकडूनच हे आदेश प्राप्त आहेत. केंद्रीय स्वयंपाकगृहात पोषण आहार शिजविल्यानंतर त्याचे वितरण होणार आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)