शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

अपघाताच्या संख्येत एस. टी.चे चाक घसरतेय

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

वर्षभरात १३२ अपघात : रस्ता सुरक्षा सप्ताह महामंडळाला वाचवणार?

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी नववर्षाच्या आरंभीच रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. अपघात कमी होण्यासाठी प्रशिक्षणे, मार्गदर्शने यांसारखे विविध उपक्रम महामंडळ राबवित असते. परंतु गेल्या वर्षभराचा आढावा घेतला तर अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्षभरात आतापर्यंत एकूण १३२ अपघात झाले आहेत.वास्तविक महामंडळाकडून दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. केवळ सप्ताहाच्या कालावधीपुरती सुरक्षेबाबत खबरदारी घेण्यापेक्षा याबाबत कायमस्वरूपी दक्ष राहणे अपेक्षित आहे. वेळोवेळी चालकांसाठी प्रशिक्षण, योग्य नियोजन, गाड्यांची दुरूस्ती, जुन्या गाड्या भंगारात काढून नवीन गाड्यांचा समावेश आदी बाबींची दक्षता घेऊनसुध्दा गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत अपघाताच्या संख्येत यावर्षी वाढ झाली आहे. २०१३मध्ये वर्षभरात १२० अपघात झाले होते. २०१४मध्ये ८८ अपघात घडले, तर यावर्षी तब्बल १३२ अपघात झाले आहेत. पैकी मरणांतक १४, गंभीर १०२, किरकोळ १६ अपघात घडल्याची नोंद आहे. सन २०१३मध्ये एकूण १२० अपघातांपैकी १७ प्राणांतिक अपघात असून, ९६ अपघात गंभीर, तर किरकोळ अपघात ७ घडले होते. सन २०१४मध्ये प्राणांतिक अपघात ९ असून, गंभीर अपघात ७३ तसेच किरकोळ अपघात ६ झाले होते. सलग दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी मरणांतक अपघातामध्ये वाढ झाली आहे. एस. टी.च्या ७९० गाड्या असून, दररोज ४५०० फेऱ्यांव्दारे २ लाख १६ हजार किलोमीटर प्रवास होतो. त्यासाठी दररोज एकूण ५० हजार लीटर डिझेल लागते. किमान ३०,१५,५०० रूपये खर्च येतो. प्रतिदिन विभागाला ६५ लाख रुपये खर्च येतो. विभागात १४७३ चालक, १६०० वाहक आहेत. दरमहा सरासरी ५ ते १७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत असून, वर्षभरात ९६ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून २१ हजार ३६४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गतवर्षी (२०१४) एकूण १३९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ३१ हजार ७८४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. आता फुकट्या प्रवाशांचे प्रमाण कमी झाले असले तरी अपघात वाढले आहे. यावर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. अपघात कमी होण्यासाठी महामंडळ आणखी काही खबरदारी घेत कोणते नियोजन करते, यावरच प्रवाशांची सुरक्षितता अवलंबून आहे. (प्रतिनिधी)महिनेप्राणांतिकगंभीरकिरकोळएकूणजानेवारी२३१६फेब्रुवारी०७३१०मार्च२७११०एप्रिल१८११०मे०७३१०जून०१०३१३जुलै३१००१३आॅगस्ट१११२१४सप्टेंबर११३११५आॅक्टोबर०७१८नोव्हेंबर११००११डिसेंबर३८११२एकूण१३९७१६१३२