शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर आता ‘स्पीड गन’ची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : बेदरकारपणे वाहन चालविणाºया व नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर आता ‘स्पीड गन’ची नजर राहणार आहे. ही स्पीड लिमिट यंत्रणा महामार्ग पोलीस विभागाकडे उपलब्ध झाली असून, लवकरच महामार्गावर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्याचप्रमाणे जे वाहनचालक वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळतील अशा चालकांचा वाहन परवाना रद्द ...

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : बेदरकारपणे वाहन चालविणाºया व नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर आता ‘स्पीड गन’ची नजर राहणार आहे. ही स्पीड लिमिट यंत्रणा महामार्ग पोलीस विभागाकडे उपलब्ध झाली असून, लवकरच महामार्गावर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्याचप्रमाणे जे वाहनचालक वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळतील अशा चालकांचा वाहन परवाना रद्द करण्यात यावा याबाबतचा प्रस्तावही आरटीओकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक उमाकांत पालव यांनी दिली.महामार्गावर वाहन चालविताना नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर वाढत्या अपघातांवर निश्चितच आळा बसविता येईल. नियम धुडकावून वाहन चालविणाºया वाहनचालकांवर आता स्पीड गन यंत्रणेची नजर राहणार आहे. महामार्गावर झाराप ते खारेपाटण दरम्यान ज्या ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र आहे आणि ज्या ठिकाणी वाहतूक वेग मर्यादा ताशी ४० ते ५० किलोमीटर वेग आहे अशाठिकाणी हे यंत्र बसविण्यात येणार आहे.एखाद्या वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. जर नियम तोडून चालक वाहनासहीत पळून गेल्यास स्पीड गन मशीनच्या साहाय्याने त्याच्या राहत्या घरी कारवाईबाबतची नोटीस बजावण्यात येणार आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा कसाल येथील महामार्ग वाहतूक पोलीस विभागाकडे उपलब्ध झाली असून, लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती पालव यांनी दिली.विशेष मोहिमेत दीड लाखाचा महसूलमुंबई वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्गात महामार्गावर १२ ते २९ जुलैदरम्यान वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये बेदरकारपणे वाहन चालविणे, वाहनांवर टेल लाईट नसणे, रिफ्लेक्टर नसणे, काळ्या रंगाच्या काचा, सीट बेल्ट न वापरणे, हेल्मेटचा वापर नाही आदी १५४ वाहनचालकांवर वरील गुन्ह्यांमध्ये कारवाई करत दीड लाख रुपये महसूल गोळा केला आहे.