शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आता मालवणात फिश एक्वेरियम, वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 11:41 IST

सिंधुदुर्गात वाढणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मालवणमध्ये फिश एक्वेरियम साकारणार आहे. यासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपयांचा निधी आमदार नाईक यांनी मंजूर करून घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णयदेखील निर्गमित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआता मालवणात फिश एक्वेरियम, वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश पहिल्या टप्प्यात ५ कोटी निधी मंजूर

मालवण : सिंधुदुर्गात वाढणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मालवणमध्ये फिश एक्वेरियम साकारणार आहे. यासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपयांचा निधी आमदार नाईक यांनी मंजूर करून घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णयदेखील निर्गमित करण्यात आला आहे.मालवण शहर पर्यटनदृष्ट्या झपाट्याने विकसित होत आहे. दरवर्षी लाखो पर्यटक मालवण समुद्र किनारी भेट देतात. मालवण समुद्रात माशांच्या विविध प्रजाती असून या प्रजाती प्रत्यक्ष पाहता याव्यात, तसेच मालवणच्या पर्यटनात वाढ व्हावी यासाठी मालवण शहरात अद्ययावत फिश एक्वेरियम उभारण्याचा आमदार वैभव नाईक यांचा मानस होता.आमदार नाईक यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून फिश एक्वेरियमसाठी पहिल्या टप्प्यात ५ कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. लॉकडाऊनचा कालावधी असतानाही निधी मंजूर केल्याबद्दल आमदार नाईक यांनी शिंदे यांचे आभार मानले आहेत.यामुळे मालवणच्या पर्यटनात वाढ होणार असून पर्यटनपूरक इतर व्यवसायांबरोबरच परिसरातील स्थानिकांना रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होणार आहेत. 

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक