शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आता उत्सुकता नगराध्यक्ष आरक्षणाची

By admin | Updated: November 6, 2015 00:01 IST

आरक्षण ठरवणार नगरपंचायतीचा कारभार : युतीला हवे ‘खुले’ तर आघाडीला ‘मागासवर्गीय

 वैभव साळकर-- दोडामार्ग --कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत सेना-भाजपा युतीने निर्विवाद वर्चस्व मिळविले असले, तरी अद्याप नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने नगराध्यक्ष कोणाचा होणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. परिणामत: नगराध्यक्षाच्या आरक्षणानंतरच नगराध्यक्षपदाच्या मोर्चेबांधणीस सुरूवात होणार आहे. आरक्षण खुले पडल्यास सेनेकडून संतोष म्हावळंकर, तर भाजपाकडून चेतन चव्हाण यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र, जर आरक्षण मागासवर्गीय समाजासाठी पडले, तर नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत.कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत १७ पैकी सेना-भाजपा युतीच्या १० जागा जिंकून आल्या. तर एका ठिकाणी मनसे, चार जागांवर काँग्रेस आणि दोन जागांवर राष्ट्रवादीला संधी मिळाली. एकंदरीत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत सेना-भाजपने बाजी मारली. सेना-भाजपाला प्रत्येकी पाच-पाच जागा मिळाल्या. परंतु तरीसुध्दा मागासवर्गीय समाजाचा उमेदवार युतीचा निवडून आला नाही. याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार अरूण जाधव निवडून आले. परिणामत: सत्ता जरी आली असली, तरी युतीकडे मागासवर्गीय समाजाचा नगरसेवक उपलब्ध नाही. त्यामुळे जर नगराध्यक्षपद मागासवर्गीय समाजासाठी आरक्षित झाले, तर आपसूकच राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद मिळेल. जर खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाले, तर सेनेकडून संतोष म्हावळंकर आणि भाजपाकडून चेतन चव्हाण यांचा दावा होऊ शकतो. जर हे पद खुल्या अथवा इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्यास सेनेकडून इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग क्र. ७ मधून निवडून आलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या संध्या राजेश प्रसादी यांना, तर भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा उद्देश कोरगावकर यांना संधी मिळू शकते. परंतु इतर मागास प्रवर्ग (पुरूष) साठी जर नगराध्यक्षपद राखीव आले, तर भाजपाचे सुधीर पनवेलकर हे एकमेव दावेदार युतीकडून असतील. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. कारण त्यानंतरच राजकीय घडामोडींना सुरूवात होईल. नगराध्यक्षपदाची पहिली संधी कोणाला द्यावी, या सेना-भाजपाच्या निर्णयावर देखील बरीच राजकीय समीकरणे अवलंबून असतील. काँग्रेसचा सावध पवित्रा!दरम्यान, सध्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून पराभवानंतर नगरपंचायतीत विरोधात बसण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. एक सक्षम विरोधक म्हणून भूमिका पार पाडू, अशी प्रतिक्रिया काँगे्रसचे प्रचारप्रमुख संजू परब यांनी दिली. मात्र, प्रत्यक्षात आघाडीची नेतेमंडळी सर्व राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असून, नगराध्यक्षपदाच्या आरक्षणानंतर घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर आघाडीची निर्णय प्रक्रिया अवलंबून असेल. परंतु तूर्तास तरी काँग्रेस-राष्ट्रवादी सावध भूमिकेत असल्याचे चित्र आहे. नगराध्यक्षपदाची निवड हा निवडणूक आयोगामार्फत आदेश काढून करण्यात येते. अजूनतरी दोडामार्ग नगरपंचायत नूतन नगराध्यक्षपदासाठी कागदोपत्री काहीच आदेश आले नाहीत. निवडणूक आयोगामार्फत आदेश आल्यानंतर याची तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. तोपर्यंत आहे त्याच प्रमाणे प्रशासकामार्फत कारभार सुरू राहील. - विठ्ठल इनामदार,उपविभागीय महसूल अधिकारी