शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन व्यावसायिकांना नोटिसा, देवबाग, मालवणमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:34 IST

देवबाग येथील बोटिंग आणि वॉटरस्पोर्ट्स एक खिडकीचा वाद पर्यटन व्यावसायिकांत धुमसत असतानाच बंदर विभागाचे प्रादेशिक बंदराचे निरीक्षक कॅप्टन सुरज नाईक यांच्या आदेशानुसार येथील बंदर विभागाने देवबाग आणि मालवणमधील १४ पर्यटन व्यावसायिकांना पर्यटन प्रवासी कराचा (लेव्ही) भरणा करावा, अशा नोटीसा बजावल्या आहेत.

ठळक मुद्देपर्यटन व्यावसायिकांना नोटिसा, देवबाग, मालवणमधील प्रकारबंदर विभागाचे पर्यटन प्रवासी कराची भरणा करण्याचे आदेश

मालवण : देवबाग येथील बोटिंग आणि वॉटरस्पोर्ट्स एक खिडकीचा वाद पर्यटन व्यावसायिकांत धुमसत असतानाच बंदर विभागाचे प्रादेशिक बंदराचे निरीक्षक कॅप्टन सुरज नाईक यांच्या आदेशानुसार येथील बंदर विभागाने देवबाग आणि मालवणमधील १४ पर्यटन व्यावसायिकांना पर्यटन प्रवासी कराचा (लेव्ही) भरणा करावा, अशा नोटीसा बजावल्या आहेत.क्यार आणि महाचक्रीवादळाचा फटका बसल्याने आधीच पर्यटन व्यावसायिकांचे कंबरडे मोडले असतानाच आणि पर्यटन व्यवसायाला आता कुठे सुरुवात होत असतानाच प्रादेशिक बंदर निरीक्षकांनी प्रवासी कर भरणा करण्याचा फतवा काढल्याने जलक्रीडा व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.नाताळाची सुट्टी सुरु झाल्याने गेले चार पाच दिवस येथे देशी विदेशी पर्यटकांची रेलचल सुरु झाली आहे. येथे येणारे पर्यटक हे सिंधुदुर्ग किल्ला बरोबरच देवबाग, तारकर्ली, चिवला बीच, रॉक गार्डन या बरोबरच जलक्रीडांना पसंती देतात.

येथील पर्यटन हंगाम हा खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरु होतो. मात्र क्यार आणि महा या समुद्री चक्रीवादळाच्या फटक्यामुळे पर्यटन व्यवसाय कोलमडून गेला आहे. नाताळाची सुटी जाहीर झाल्याने गेले पाच सहा दिवस येथे पर्यटकांची रेलचेल वाढली आहे.

देवबाग येथे जलक्रीडा व्यवसायात एक खिडकी योजनेवरून वाद निर्माण झाला या वादावरून प्रादेशिक बंदर अधिकारी सुरज नाईक यांनी येथे भेट देत देवबाग येथील जलक्रीडा व्यावसायिकांची बैठक बोलावली होती.या बैठकीत देवानंद चिंदरकर वगळता इतर पर्यटकांनी अनुपस्थिती दर्शविल्याने संतप्त झालेल्या कॅप्टन नाईक यांनी देवबागसह मालवणमधील १४ जलक्रीडा व्यावसायिकांना शासनाचा प्रवासी कर भरावा. अन्यथा कारवाई करू असा इशारा दिला.पर्यटन व्यवसाय थंडावल्यामुळे कर भरण्यास उशिरवस्तूत: देवबाग किंवा मालवणमधील जलक्रीडा व्यावसायिक हे दरवर्षी वेळेतच प्रवासी कर (लेव्ही) भरतात. यावेळी मात्र क्यार, महा या वादळामुळे पर्यटकांची संख्या रोडावली. त्यामुळे पर्यटन व्यवसाय थंडावला. परिणामी या जलक्रीडा व्यावसायिकांना कर भरण्यास उशीर झाला आहे.

अशावेळी कॅप्टन सुरज नाईक यांनी येथील बंदर अधिकाऱ्यांना जलक्रीडा व्यावसायिकांना प्रवासी कराचा भरणा करण्यात यावा अशा आशयाच्या नोटीसा बजावण्यास सांगितल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी येथील बंदर अधिकाºयांनी या नोटीसा बजावल्या.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्गTaxकरtourismपर्यटन