शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

‘कातकरीं’च्या वनौषधी मधाचे नामकरण

By admin | Updated: May 1, 2015 00:23 IST

सजग नागरिक मंचचा उपक्रम : ‘फॉरेस्ट हनी’ नावाने मध बाजारात

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नारूर येथील कातकरी समाजाच्या वनौषधी मध उत्पादन व्यवसायाला सजग नागरिक मंचाने ऊर्जितावस्था दिली आहे. या मधोत्पादनाचे ‘फॉरेस्ट हनी’ असे नामकरण करण्यात आले असून, कुडाळ येथे या उत्पादनाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. सजग नागरिक मंचाच्या या उपक्रमामुळे कातकरी समाजाला आर्थिक सुबत्ता मिळण्याची आशा वाढली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्य करणारे आणि पूर्णत: निसर्गावरच अवलंबून असणारा कातकरी समाज पांरपरिक पद्धतीने दंड प्रहार करून मोठ्या प्रमाणात मध गोळा करतो. या नैसर्गिक मधामध्ये वनौषधी गुणधर्म असतात. मात्र, या मधाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. जिल्ह्यातील आणि बाहेरील व्यापारी हा मध कमी दरात खरेदी करतात. त्यामुळे येथील कातकरी समाज अर्थाजर्नाने कमकुवतच आहे. या समाजाने गोळा केलेल्या औषधी मधाला बाजारात चांगली किंमत मिळावी, तसचे त्यातून त्यांना चांगले अर्थार्जन व्हावे, यासाठी सजग नागरिक मंचच्या अ‍ॅड. सुहास सावंत, सचिन देसाई, मोहम्मद शेख, अ‍ॅड. समीर कुलकर्णी, कार्यकर्त्यांनी या कातकरी समाजाशी बोलून या उपक्रमाबाबत माहिती दिली. त्यानंतर कातकरी समाजाच्या सहकार्यातून त्यांनी गोळा केलेल्या मधावर प्रक्रिया करून सुबक स्वरुपातील उत्पादन बाजारात आणले आहे. याकामी त्यांना पंचायत समितीचे सदस्य दीपक नारकर यांनी सहकार्य केले. कातकरी समाजाने गोळा केलेल्या मध उत्पादनाला सजग नागरिक मंचाने ‘फॉरेस्ट हनी’ असे नाव दिले आहे. या उत्पादनाचा उद्घाटन समारंभ येथील मराठा समाज सभागृहात अ‍ॅड. अजित भणगे, कातकरी समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे डॉ. विजय साठे, कुडाळचे उपसभापती आर. के. सावंत, डॉ. वंदना करंबेळकर, अ‍ॅड. सुहास सावंत यांच्या हस्ते व तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडले. डॉ. वंदना करंबेळकर म्हणाल्या की, कातकरी समाज पारंपरिक पद्धतीने दंड प्रहार करून मध काढतो. त्यांनी गोळा केलेल्या मधात औषधी गुणधर्म असतात. तसेच तो त्रिदोष नाशकारकही असतो, असे सांगितले. दीपक नारकर यांनी सर्व बाजूंनी वंचित असलेला कातकरी समाज लाखो रुपयांच्या मधाचे उत्पादन करतात. परंतु,योग्य बाजारभाव मिळत नसल्याने त्यांना कवडीमोल मोबदला मिळतो.अ‍ॅड. अजित भणगे यांनी सजग नागरिक मंचच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या कार्याला राजकीय वळण लागू देऊ नका, असे आवाहन केले. यावेळी संजय पिंगुळकर, पंचायत समितीचे सदस्य दीपक नारकर, बनी नाडकर्णी, अतुल बंगे, अ‍ॅड. अमोल सामंत व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. समाज उपेक्षितयावेळी डॉ. विजय साठे म्हणाले, कातकरी समाजाकडे मातीतून सोने काढण्याची कला आहे. त्यांना निसर्गाने चांगल्या शक्ती दिल्या आहेत. नागरी समाजाला घाबरणारा हा समाज व्यसनाधीन असल्याने विकासाची पाळेमुळे त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलीच नाहीत. त्यामुळे हा समाज उपेक्षितच राहिला. ही स्थिती अशीच राहिल्यास भविष्यात १०० वर्षांनंतर हा समाज नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.