शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली धबधब्याला पर्यटकांची प्रतीक्षा; लॉकडाऊन, जिल्हाबंदीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 02:44 IST

वर्षा पर्यटनाचा पहिलाच रविवार सुनासुना

आंबोली : गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोलीतील मुख्य धबधबा काही अंशी प्रवाहित झाला आहे. त्यामुळे आंबोलीत वर्षा पर्यटन हंगामाच्या पहिल्याच रविवारी गर्दी होईल अशी अपेक्षा होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या जिल्हा बंदीमुळे आंबोलीच्या वर्षा पर्यटनाकडे सर्वांनी पाठ फिरविली. याशिवाय शासनाने पर्यटन चालू करण्याबाबत कोणतेही धोरण स्वीकारले नसल्याने आंबोली धबधबा पर्यटकांच्या प्रतीक्षेत होता.पर्यटक येत नसल्याने हातावरती पोट असलेल्या येथील पर्यटन व्यावसायिकांवर मात्र उपासमारीची वेळ येणार आहे. कारण गतवर्षीही अतिवृष्टीमुळे येथील वर्षा पर्यटन झाले नव्हते. त्यानंतर दिवाळी व नाताळ या कालावधीत येथील व्यावसायिकांनी काही प्रमाणात व्यवसाय केला. परंतु पुन्हा कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आंबोलीतील मुख्य पर्यटन हंगाम मे महिनासुद्धा पर्यटनाविना सुनासुना गेला. त्यामुळे आतापर्यंत आंबोलीतील पर्यटन व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने योग्य नियोजन व नियमावली तयार करून येथील वर्षा पर्यटन चालू करावे, अशी मागणी येथील पर्यटन व्यावसायिकांमधून होत आहे.तोंडचे पाणी पळालेयावर्षी श्रावण महिनाही लवकर असल्यामुळे थोडाफार कालावधी वर्षा पर्यटनासाठी मिळणार होता. परंतु त्यात कोरोनामुळे जिल्हाबंदी असल्याने हाही वर्षा पर्यटन हंगाम होणार नाही अशी चिन्हे आहेत. त्यामुळे आंबोलीतील पर्यटन व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.