शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
4
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
5
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
6
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
7
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
8
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
9
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
10
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
11
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
12
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
13
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
14
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
15
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
16
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
17
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
18
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
19
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर नाही - प्रदेश काँग्रेसची रणनीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:51 IST

काँग्रेसची सिंधुदुर्ग कार्यकारिणीे अखिल भारतीय काँग्रेसने बरखास्त केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधणार हे गृहीत धरून प्रदेश काँग्रेसच्यावतीने रणनीती आखली गेली आहे. या रणनीतीप्रमाणे राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तरच द्यायचे नाही, असे ठरविण्यात आले आहे.

- अनंत जाधवसावंतवाडी, दि. 18 -  काँग्रेसची सिंधुदुर्ग कार्यकारिणीे अखिल भारतीय काँग्रेसने बरखास्त केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधणार हे गृहीत धरून प्रदेश काँग्रेसच्यावतीने रणनीती आखली गेली आहे. या रणनीतीप्रमाणे राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तरच द्यायचे नाही, असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे राणेंच्या आरोपातील हवा निघून जाईलच; त्याशिवाय राणे पक्षातून गेले तर काँग्रेसवर याचा कोणताही फरक पडत नाही हेही यातून दिसून येईल, असा या रणनीतीचा भाग मानला जात आहे. याची अंमलबजावणी सिंधुदुर्गस्तरावर करण्याचे निर्दशही पक्षाने नूतन जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेस सोडणार, अशी चर्चा गेले कित्येक महिने सुरू आहे. मात्र, या चर्चेप्रमाणे अद्याप मुहूर्त मिळत नाही. मात्र, आता राणेंचा भाजप प्रवेश जवळ आल्याने काँग्रेसनेही तशी पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. आठवड्यापूर्वी प्रदेश काँग्रेसच्यावतीने एक शिष्टमंडळ जिल्ह्यात पाठविले होते. मात्र, यावेळी झालेल्या बैठकीत राणे समर्थकांनीच प्रदेश स्तरावरून आलेल्या नेत्यांना धारेवर धरत ही बैठक हॉयजॅक केली होती. तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पक्षात फूट पाडत असल्याचा आरोपही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी केला होता.या बैठकीचा अहवाल खासदार हुसेन दलवार्इं यांनी प्रदेश काँग्रेसला दिला होता. या अहवालानुसार अखिल भारतीय काँग्रेसने शनिवारी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली आहे. ही बरखास्ती राणे यांच्या जिव्हारी लागणार हे काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना माहीत आहे. त्यामुळेच राणे यांना डिवचण्यासाठीच काँग्रेसच्या काही नेत्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राणे यांनी पक्षाच्या नेत्यावर आरोप करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी आपल्या निशाण्यावर महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व सिंधुदुर्ग काँग्रेसचे नूतन अध्यक्ष विकास सावंत यांना घेतले आहे.मात्र, राणे यांची टीका काँग्रेसने गृहीतच धरली होती. त्यामुळे राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायचे नाही, अशी रणनीती काँग्रेसच्यावतीने आखली आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राणेंच्या कोणत्याच टिकेला उत्तर देत नसून त्यांनी आपल्या सहकाºयांनाही उत्तर द्यायचे नाही असे सांगितले आहे. राणेंच्या आरोपांना उत्तर दिले नाही, तर त्यांच्या आरोपातील हवा निघून जाईल तसेच राणे हे काँग्रेसमधून गेलेच तर त्याचा पक्षावर कोणताच परिणाम होणार नाही, असेही यातून दिसून येईल, अशी यामागची रणनीती असल्याचे दिसून येत आहे.प्रदेश काँग्रेसच्या या रणनीतीची अंमलबजावणी जिल्हास्तरावर करण्याचे आदेशही नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांना दिले आहेत. त्यामुळे सावंत हे राणे यांच्या सध्या तरी आरोपांना उत्तर देण्याच्या मनस्थितीत नसून, त्यांच्यावर राणे किंवा अन्य नेत्यांनी कोणतेही आरोप केले तर त्याचा खुलासा मात्र करणार, असे नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी सांगितले. मात्र, प्रदेश काँग्रेसची जशी रणनीती असेल तसे आम्ही काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रणनीती नाही, मात्र आम्ही ठरवलेच : प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणनारायण राणे हे आजही काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे ते आमच्यावर टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र तरीही त्यांनी पक्षावर टीका केली, तर आम्ही त्यावर प्रत्युत्तर देणार नाही. ही रणनीती नाही, मात्र आम्ही तसे ठरविले आहे .पक्षाचे काम करून पक्ष मोठा करणे हे आमचे धोरण आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे