शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनारसिद्धचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले ५ भाविक कार अपघातात ठार
2
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: PSI परीक्षेचा निकाल जाहीर, कोणी पटकावला प्रथम क्रमांक?
3
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
4
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
5
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
6
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
7
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
8
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
9
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
10
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
11
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
12
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
13
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

चाकरमान्यांना कोकणात येण्यापासून कोणीही अडवणार नाही : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 7:14 PM

कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना कोणीही अडवणार नाही यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देचाकरमान्यांना कोकणात येण्यापासून कोणीही अडवणार नाहीखासदार विनायक राऊत यांचे आश्वासन

कुडाळ : कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांबाबत राज्य सरकार लवकरच योग्य तो निर्णय घेणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कोणीही अडवू शकणार नाही, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्णय घेण्याचा कोणताच अधिकार नसून मुंबईत बसून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भाषा करणाऱ्यांनी चाकरमान्यांची काळजी करू नये. आम्ही सक्षम आहोत, असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

कुडाळ शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी शुक्रवारी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, उपसभापती जयभारत पालव, नगरसेवक सचिन काळप, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, जिल्हा युवा समन्वयक सुशील चिंदरकर, राजू जांभेकर, सुयोग ढवण, राजू गवंडे तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार राऊत म्हणाले, जिल्हा प्रशासनाने गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाºया चाकरमान्यांबाबत कोणता निर्णय घ्यावा याबाबत प्रत्येक अधिकाºयांकडे माहिती मागविली होती.

त्याबाबतचे इतिवृत्त सर्वत्र जाहीर झाल्यानंतर गणेश चतुर्थी सणासाठी चाकरमान्यांना बंदी करण्यात येणार असल्याची अफवा पसरू लागली. काहींनी तर चाकरमान्यांना येऊ दिले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भाषा केली आहे.

मात्र, चाकरमानी गणेश चतुर्थीत कोकणात येणे किंवा न येणे याबाबतचा निर्णय हा जिल्हा प्रशासन घेऊ शकत नाही. हा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. त्यामुळे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गणेश चतुर्थी सणात कोकणात येणाºया चाकरमान्यांबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी आचारसंहिता बनविली. तसेच त्यांना कमीतकमी दिवसांचे क्वारंटाईन करण्यात यावे. जे चाकरमानी येत असतील त्यांची जिथून येत असतील तेथेच कोविड चाचणी सवलतीच्या दरात करण्यात यावी, अशाप्रकारच्या मागण्या केल्या असून मुख्यमंत्री व राज्य सरकार लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे.

मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाच्या इतिवृत्ताचे भांडवल करून चाकरमान्यांना परवानगी न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाची भाषा मुंबईत बसून करणाºयांनी चाकरमान्यांची काळजी करू नये. त्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे.गणेशोत्सव काळात भजने बंद ठेवणे गरजेचेगणेशोत्सवात भजनांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर्षी तरी भजने बंद ठेवणे गरजेचे आहे. तसेच गणपती जास्तीत सात दिवस ठेवावेत असे आपले मत आहे, असे त्यांनी सांगितले. चाकरमान्यांना गणेश चतुर्थी सण साधण्यासाठी जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत