शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

कोणाचीही धाकदपटशा खपवून घेणार नाही

By admin | Updated: October 18, 2015 00:22 IST

नगरपंचायत निवडणूक : वैभववाडीतील व्यापारी, राजकीय पक्षांचा एल्गार

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी परजिल्ह्यातून आलेल्या अनोळखी व्यक्तींकडून व्यापारी व नागरिकांना धमकावले जात आहे. परंतु वैभववाडी शहर शांतताप्रिय आहे. त्यामुळे कोणाचीही धाकदपटशा खपवून घेतली जाणार नाही, असा एल्गार व्यापारी व राजकीय पक्षांनी पत्रकार परिषदेत दिला. सज्जनराव रावराणे यांना धमकावल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांसह वैभववाडीतील व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस अधिकाऱ्यांशी त्या घटनेबाबत चर्चा केली. त्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर सर्वपक्षीय पत्रकार परिषद झाली. यावेळी वैभववाडी शहर शांतताप्रिय आहे. परंतु, नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेरून आलेल्या अनोळखी व्यक्तींकडून व्यापारी व नागरिकांना धमकावले जात आहे. त्यामुळे शहरात सध्या प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक प्रत्येक पक्षाने लढवावी. परंतु येथील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कुठल्याच पक्षाने करू नये. आम्ही वैभववाडीची कणकवली किंवा वेंगुर्ले कदापि होवू देणार नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा सर्वपक्षीयांनी दिला. (प्रतिनिधी) सर्वपक्षीय, व्यापारी आक्रमक : भीती निर्माण करु नका; गुंडशाहीला जनता उत्तर देईल स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत संबंध आड येतात तेही जपावेच लागतात. त्यामुळे तंबी देऊन, भीती निर्माण करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न कुणी करू नये. सज्जनरावांना दिलेल्या धमकीचा आपण निषेध करतो. जनता याचा जरूर विचार करेल. परंतु वैभववाडीत दहशतवाद खपवून घेणार नाही, असे मत व्यापारी दिगंबर सावंत यांनी व्यक्त केले.बाहेरून माणसे आणून स्थानिकांमध्ये दहशत निर्माण करुन निवडणूक जिंकता येणार नाही. याचे भान ठेवावे. खेळीमेळीने निवडणुकीचा प्रचार सुरु असताना सज्जनरावांसारख्या जेष्ठांना धमकावले जात आहे. परंतु येथील नागरिक सुज्ञ आहेत. त्यामुळे विरोधकांच्या गुंडशाहीला जनताच उत्तर देईल, असे शिवसेनेचे जयेंद्र रावराणे म्हणाले.खेळीमेळीच्या वातावरणात नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू असताना गुंड आणून दहशत निर्माण करण्याची गरज नव्हती. परंतु ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याने त्यांना गुंड आणावे लागले. परंतु येथील नागरिकांना दहशतवाद नको आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालातून मतदार दहशतीचा निषेध नोंदवतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे यांनी व्यक्त केली. बाहेरून माणसे आणून निवडणूक लढविण्याची वेळ येत असेल तर ही पक्ष संपल्याची लक्षणे आहेत. त्यामुळे अशा पक्षाने नगरपंचायतीच्या निवडणुकीतून माघार घेतलेली बरी! अशा शब्दात मनसेचे माजी तालुकाध्यक्ष विजय रावराणे यांनी टीका केली.