शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

विकासप्रश्नी पाठपुरावा करणार : नीतेश राणे

By admin | Updated: November 18, 2014 23:25 IST

नगरपंचायतमध्ये घेतला आढावा

कणकवली : शहरातील विकासकामे आणि समस्यांसंदर्भात राज्यसरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले. नगरपंचायतींच्या सर्व नगरसेवक आणि प्रशासनासोबत आमदार राणे यांनी मंगळवारी चर्चा करून विकासकामांसंदर्भात आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, उपनगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते. आमदार राणे म्हणाले की, पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे नगरपंचायत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना भेटून आढावा घेतला. शहराच्या विकासासंदर्भात भविष्यात काही निर्णय घ्यायचे आहेत. तसेच महत्त्वाची पावले उचलायची आहेत त्याअनुषंगाने आज चर्चा झाली. मुख्य सात- आठ विषयांसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात नगरपंचायत आणि शहरासंदर्भात महत्त्वाच्या विषयांवर आपण काही मुद्दे मांडणार आहोत. राज्यसरकारकडे शहरातील भुयारी गटार योजना, कर्मचारी आकृतिबंधाचा प्रश्न आदी प्रश्नांसाठी पाठपुरावा करू. नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणे आवश्यक आहे. काही मुलभूत प्रश्न सुटल्यास बरेच अन्य प्रश्न मार्गी लागतील. नगरपंचायतीमध्ये कॉँग्रेसची सत्ता असून आमदारही कॉँग्रेसचा असल्याने एकत्रितरित्या सुनियोजितपणे काम केले जाईल. नगरपंचायतीच्या संदर्भात अजून साडेतीन वर्षे आमच्या हातात आहेत. स्वयंसेवी संस्थांनाही शहर विकासासाठी काम करताना सोबत घेतले जाईल. ‘ट्विटर’ वर केलेल्या वक्तव्याचे समर्थन करताना आमदार म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फार मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अनेकांच्या जीवनात बदल घडवला. त्यांना भारतरत्न मिळावा, हे योग्यच आहे. (प्रतिनिधी)नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आप्पा धर्माधिकारी यांना राज्यात स्वच्छता अभियानाचे दूत म्हणून नेमण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी राज्यभरात एकाच दिवसांत मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचे काम केले. त्यामुळे आप्पा धर्माधिकारी यांना ‘सिंधुदुर्ग भूषण’ पुरस्काराने गौरविले जावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे केल्याचे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.