शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

नीलेश राणे यांची अखेर जामिनावर मुक्तता

By admin | Updated: May 25, 2016 00:23 IST

.काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचे अपहरण व मारहाणप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांना शुक्रवारी अटक केली होती.

रत्नागिरी : काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचे अपहरण व मारहाणप्रकरणी अखेर मंगळवारी सायंकाळी माजी खासदार नीलेश राणे यांची मुक्तता करण्यात आली आहे. रुग्णालयातून काही वेळ कारागृहात जाऊन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पाच वाजता ते मुक्त झाले आणि गाडीतून रवाना झाले.काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचे अपहरण व मारहाणप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांना शुक्रवारी अटक केली होती. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, त्यांचा जामीन फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यांना जिल्हा विशेष कारागृहात नेण्यात येत होते. मात्र, पोटात दुखत असल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम कामथे उपजिल्हा रुग्णालय आणि नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चिपळूण न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर खेड जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयात त्यांच्यावतीने अपील करण्यात आले. सोमवारी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर खेड न्यायालयाने राणे यांचा १५ हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक्याचा सशर्त जामीन मंजूर केला. मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खेड न्यायालयाचे आदेश घेऊन चिपळूण न्यायालय गाठले. दुपारच्या सत्रात चिपळूण न्यायालयासमोर हे कागदपत्र सादर झाले. तेथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते आदेश रत्नागिरीकडे आणण्यात आले.दुपारी तीन वाजता राणे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तेथून त्यांना पोलिस बंदोबस्तात जिल्हा विशेष कारागृहात नेण्यात आले. कारागृहात कागदपत्रे सादर करण्यात आल्यानंतर दहा मिनिटांतच सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले. ४.४९ वाजता आदेश घेऊन आलेली गाडी कारागृहासमोर आली आणि ४.५८ ला राणे यांची सुटका करण्यात आली. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या ताफ्यात नीलेश राणे त्यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानाकडे निघून गेले. यावेळी कारागृहाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांची गर्दीमाजी खासदार नीलेश राणे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातून जिल्हा विशेष कारागृहात आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्यासमवेत कार्यकर्त्यांचा ताफा होता. कारागृहासमोर गाड्या लावून कार्यकर्ते चिपळूणहून कागदपत्रे घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत उपस्थित होते. चिपळूणहून कार्यकर्त्यांची गाडी कागदपत्रे घेऊन येताच कारागृहात कार्यकर्ते गेले. अवघ्या नऊ मिनिटांत कागदपत्रे सोपस्कार पूर्ण होऊन राणे बाहेर आले. राणे बाहेर येताच कार्यकर्त्यांनी घोषणा सुरू केल्या. कार्यकर्त्यांना अभिवादन करून राणे गाडीत बसले व बंगल्याच्या दिशेने निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ कार्यकर्तेदेखील निघून गेले. राणे जिल्हा रुग्णालयातून कारागृहात येताच परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आज हजेरी लावणारखेड न्यायालयाने राणे यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार त्यांना दर बुधवारी चिपळूण पोलिस ठाण्यात हजेरी लावायची आहे. त्यामुळे आज, बुधवारी राणे चिपळूणला रवाना होतील.