शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Sindhudurg: माटणेत शंभर एकरात नवीन एमआयडीसी प्रस्तावित, मंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती

By अनंत खं.जाधव | Updated: October 4, 2024 15:42 IST

आडाळी येथे नव्या प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन 

सावंतवाडी : आडाळी (दोडामार्ग) एमआयडीसीत येत्या चार दिवसात नवीन प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. या संदर्भात मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत १२ मोठ्या उद्योजकांसमवेत बैठक झाली असून आडाळीत इंडस्ट्रीयल हब निर्मिती होणार असून तेथील जागा कमी पडेल. त्यामुळे लवकरच दोडामार्ग तालुक्यातील माटणे येथील शासनाच्या १०० एकर जागेत दुसरी एमआयडीसी उभारण्या संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते मुंबई येथून ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते.केसरकर म्हणाले, जोपर्यंत मतदारसंघातील सर्व कामे मंजूर करून घेतली जात नाहीत, तोपर्यंत मी मतदारसंघात फिरकणार नाही. सर्व कामे शासकीय स्तरावर मंजूर करून आणल्यानंतरच येत्या चार-पाच दिवसात मतदारसंघात येणार असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.आंबोली, चौकुळ, गेळे या तीन गावांमध्ये ३५ सेक्शन वनजमिनीसंदर्भात लढा सुरू आहे. २५ वर्षांपासून या जमिनीच्या वाटपाचा निर्णय होत नव्हता. अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या जमीनप्रश्नाला स्थगिती दिली. ही स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून उठविण्यात आली. या गावातील ३५ सेक्शन उठविण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. 

शिरोडा वेळागर येथील ताज हॉटेलचा प्रश्नही सुटलाआता सुनावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले. सुनावणी घेऊन वनविभागाने तसा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. जमीन वाटपाचा निर्णयही घेण्यात आला आहे. शिरोडा वेळागर येथील ताज हॉटेलचा प्रश्नही सुटला आहे. सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे. आज शेतकऱ्यांसमवेत नऊ हेक्टर जमिनीबाबत प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात ताज हॉटेल्सच्या टीमसोबत मुंबई येथून ऑनलाईन बैठक झाली. नऊ हेक्टर जमीन वगळण्यासंदर्भात ताजचे अधिकारी, पर्यटन विभागाचे अधिकारी अशी एकत्रित पाहणी करून जोपर्यंत या जमिनीचा प्रश्न सुटत नाही, तोवर तेथे कुठलेही काम करू नये, असे ठरविण्यात आले. तसेच लेखी पत्रानेही कळविण्यात येणार आहे असेही केसरकर यांनी सांगितले.बाऊन्सर संस्कृतीविरोधात लढा सावंतवाडी मतदारसंघातून वाईट प्रवृत्तीला मी कायमचं घालवणार आहे. मी यापूर्वी अनेकांविरोधात लढा दिला. माझा लढा आता या 'बाऊन्सर' संस्कृतीविरोधात असेल. सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन इमारत टेंडरदरम्यान बाऊन्सर आणले. त्याची चौकशी करून या बाऊन्सरमागे कोण आहेत? याचा शोध घेतला जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMIDCएमआयडीसीDeepak Kesarkarदीपक केसरकर