शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रगतीसाठी नॅक मूल्यांकनाची गरज

By admin | Updated: February 15, 2015 23:41 IST

विजय नारखेडे : सावंतवाडीतील चर्चासत्रात उच्च शिक्षण सहसंचालक सहभागी

सावंतवाडी : नॅक मूल्यांकन करून घेणे हे प्रत्येक महाविद्यालयासाठी अत्यंंत आवश्यक आहे. यामुळे महाविद्यालयाने केलेल्या शैक्षणिक, संशोधनात्मक व भौतिक सुविधांमध्ये केलेल्या प्रगतीचा आढावा व भविष्यातील प्रगतीच्या तयारीसाठी नॅक मूल्यांकनाची गरज आहे, असे प्रतिपादन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी केले. सावंतवाडी येथे पंंचम खेमराज महाविद्यालयात राष्ट्रीय बँक मूल्यांकन संस्था, बंगलोर यांच्या सहकार्याने गुरुवारी आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राचे उद्घाटन दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, उपकार्याध्यक्ष शुभदादेवी भोसले, संस्थेचे सचिव अ‍ॅड. सुभाष देसाई, सहसचिव सुरेश भोसले, खजिनदार अ‍ॅड. गणेश प्रभूआजगावकर, मुंबई विद्यापीठ विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधुरी पेजावर, पुणे येथील डॉ. नागनाथ धर्माधिकारी, मुलुंड वझे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. शर्मा, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले. चर्चासत्राचे समन्वयक प्रा. बी. एन. हिरामणी यांनी चर्चासत्रासंबंधी माहिती दिली. सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी नॅक मूल्यांकनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याबाबत माहिती दिली. नॅक राष्ट्रीय मूल्यांकन संस्था, बंगलोर ही उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी महाविद्यालये व विद्यापीठाचे मूल्यांकन करणारी संस्था असून, ती त्यांच्या प्रगतीचा आढावा घेते व मार्गदर्शन करते. विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, आयक्यूएसी समिती सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)