शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

एक विचाराने प्रश्न सोडविले तरच लोकशाही टिकेल: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 10:48 IST

समृद्ध लोकशाही असलेला देश आणखी बळकट होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्क

वेगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) : बॅ. नाथ पै यांचा लोकशाही प्रणालीवर प्रचंड विश्वास होता. आजही आपल्या देशात लोकशाही टिकून आहे. जो घटक विकासापासून दूर असेल, त्याला विकासाच्या प्रक्रियेत आणले पाहिजे. तेथील प्रश्न एका विचाराने सोडविले तरच समृद्ध लोकशाही असलेला देश आणखी बळकट होईल, असे मत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.

पवार शनिवारी वेंगुर्ले येथील बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार बाळाराम पाटील, बॅ. नाथ पै यांची नात अदिती पै, शैलेंद्र पै, पद्मश्री परशुराम गंगावणे, बॅ. नाथ पै यांचे मित्र विठ्ठल याळगी, आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, बॅ. नाथ पै गरीब कुटुंबात जन्माला आले. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले असल्याने आईने छोटी-मोठी कामे करून या सात भावंडांना मोठे केले. काही अंतराने बॅ. नाथ पै बेळगाव येथे गेले. तेथे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य पूर्णपणे संघर्षातून गेले. नंतर पुढे ते इंग्लंड येथे गेले आणि तेथील काही आंदोलनात भाग घेतला, अभ्यास केला. त्यानंतर ते भारतात आले तेव्हा बेळगाव येथून विधानसभा निवडणूक लढले; परंतु पराभूत झाले. मात्र, ते मागे हटले नाहीत. पुन्हा इंग्लंड येथे गेले आणि नंतर जेव्हा पुन्हा इकडे आले, तेव्हा समाजवादी विचारसरणीत सक्रिय सहभाग घेतला. 

राजापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आणि त्यांनी प्रगल्भ विचार देशाला दिले आणि ते आजही आपण पुस्तकरूपाने वाचत आहोत, असे ते म्हणाले.

‘राजकीय जडणघडणीत पवारांचा मोलाचा वाटा’

दीपक केसरकर म्हणाले, शरद पवार हे सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. माझ्या राजकीय जडणघडणीत पवार यांचा मोलाचा वाटा असून, शांतता आणि संयम हे त्यांनीच आम्हाला शिकविले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार