शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: राजकोट येथील कोसळलेल्या शिव पुतळ्याची नौदल अधिकाऱ्यांकडून पाहणी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 27, 2024 14:07 IST

मंत्री केसरकर यांच्याशी बंद दाराआड चर्चा

मालवण: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकारसह सर्वच प्रशासकीय यंत्रणा हदरली आहे. हा पुतळा उभारण्यात भारतीय नौदलाने पुढाकार घेतला असल्याने नौदलाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान आज, मंगळवारी सकाळी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी राजकोट येथे कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. याबाबत लवकरच एक स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येणार असून हा अहवाल नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नौदल दिनाच्या निमित्ताने भारतीय आरमाराचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवण येथे उभारण्यात यावा अशी भारतीय नौदलाची योजना होती. या योजनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने नौदलाने सिंधुदुर्ग किल्ल्या नजिक राजकोट येथे तब्बल पाच कोटी रुपये खर्चून राजकोट किल्ल्याची आणि त्यात १५ फूट उंच चबुतऱ्यावर २८ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा उभारण्यासाठी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ चेतन पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती. पुतळा उभारण्याच्या कामात शासनाशी समन्वयक म्हणून लेफ्टनंट कमांडर अक्षय पाटील व कमांडर सुशील कुमार राय यांनी काम पाहिले होते. याच अधिकाऱ्यांनी मंगळवारी राजकोट येथे येत कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. या पाहणीची माध्यमांपासून गुप्तता पाळण्यात आली होती. मंत्री केसरकर यांच्याशी नौदल अधिकाऱ्यांची बंद दाराआड चर्चा..राजकोट येथील कोसळलेल्या शिव पुतळ्याची पाहणी केल्या नंतर नौदल अधिकाऱ्यांनी मालवण तहसील कार्यालय येथे मंत्री दीपक केसरकर यांच्याशी एकंदरीत परिस्थिती बाबत बंद दाराआड चर्चा केली. दरम्यान या चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. घटनेची पाहणी अंती वरिष्ठांना त्याबाबत अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजindian navyभारतीय नौदलDeepak Kesarkarदीपक केसरकर