शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
3
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
4
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
5
अर्जुन तेंडुलकसंदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
6
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
7
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
8
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
9
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
10
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
11
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
12
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
13
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
14
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
15
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
16
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
17
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
18
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
19
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
20
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला

बाजार समितीतील विजयाने आघाडीमध्ये नवचैतन्य

By admin | Updated: September 14, 2015 23:52 IST

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह : वैभववाडी, दोडामार्ग नगरपंचायतीसाठी सुरू झाली मोर्चेबांधणी

 सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने आपले एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले. १९ पैकी १८ जागा मिळवून सेना-भाजप युतीला क्लिन स्वीप केले. त्यामुळे आघाडीच्या पर्यायाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. जिल्ह्याची दोन टोके असलेल्या वैभववाडी आणि दोडामार्ग या दोन्ही नगरपंचायतींच्या तोंडावर काँग्रेसला मिळालेले हे यश त्यांचा उत्साह वाढविणारे ठरणार आहे. देशात आणि राज्यात युतीची सत्ता आहे. दोन्ही ठिकाणी भाजप-सेनेचे प्राबल्य असताना सिंधुदुर्गात गेल्या विधानसभा निवडणुकानंतर झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करत भाजप-सेनेचा वारू कायमच रोखण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यशस्वीदेखील झाले आहे. याला फक्त ग्रामपंचायत निवडणुका अपवाद मानल्या जातात. कारण ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कुडाळ, सावंतवाडी या दोन तालुक्यात शिवसेनेने मोठी मुसंडी मारली होती. मात्र, ते वगळता जिल्हा बँक निवडणूक, सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि रविवारी झालेली कृषी उप्तन्न बाजार समितीची निवडणूक असो या सर्वच ठिकाणी काँग्रेस आणि पर्यायाने आघाडीने आपली सत्ता कायम ठेवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९९0 पासून नारायण राणेंचे राज होते. म्हणजे ते शिवसेनेत असताना आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये सातत्याने जिल्ह्यातील सर्व प्रमुख केंद्रस्थाने त्यांच्या मागेच सत्ताकेंद्रीत होती. गेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत २५ वर्षात पहिल्यांदाच मोठा बदल झाला आणि जनतेने शिवसेनेच्या झोळीमध्ये मोठे यश दिले. परंतु भाजपाची पिछेहाट झाली. त्यामुळे येथील जनतेला नेमके काय अपेक्षीत आहे? याबाबतचे विश्लेषण करणे धोक्याचे ठरेल. एका बाजूने कुडाळ-मालवणमध्ये नारायण राणेंचा पराभव झाला. तर दुसऱ्या बाजूने नीतेश राणे विक्रमी मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे विजयाचा आनंद दोन्ही बाजूंनी साजरा करणे अवघड झाले होते. म्हणजे सिंधुदुर्गतील जनता ही गृहीत धरून राजकारण करणे प्रत्येकालाच अवघड जाणारे ठरत आहे. नारायण राणेंचा पराभव झाला. त्यामागे वेगवेगळी कारणे असतील, परंतु त्या काळात त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी ठेकेदारीमधून गेलेल्या गलथाण कारभाराचा सर्व फटका राणेंना बसला. मागील दहा वर्षात ‘कमीशन’साठी या ठेकेदार पुढाऱ्यांनी गावागावातील विकासकामांमध्ये केलेला भ्रष्टाचार, रस्त्यांची व इतर कामांमध्ये केलेल्या सर्व घोळांना आळा बसण्यासाठी या ठेकेदारांवरील राग राणेंच्या मतदानाच्यावेळी उमटला. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सत्ता बदल झाल्यानंतर गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत लोकांच्या अपेक्षेप्रमाणे युतीकडून कारभार होताना दिसत नाही. त्यात भाजप आणि शिवसेना अंतर्गत राज्यपातळीवर असलेले कुरबोडीच्या राजकारणामुळे लोकांच्या अपेक्षांना ब्रेक लागल्यासारखे आहे. त्याचा फटका मात्र, सिंधुदुर्गवासीयांना बसत आहे. मागील काँग्रेस आघाडी शासनाच्यावेळी काही मुद्दांवर काँग्रेसच्या नेत्यांनाच लोकांसाठी रस्त्यावर उतरावे लागत होते. त्याप्रमाणे यावेळी जिल्हा प्रशासनाच्याविरोधात काही वेळा सत्ताधारी पक्षातील आमदार वैभव नाईकांनादेखील आंदोलनात्मक पावले उचलावी लागत आहेत. त्यामुळे सत्ता जरी बदलली तरी येथील जनतेच्या ईच्छा, आकांक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. इकीकडे महागाई व इतर मुद्यांवर लोकांचा नव्या शासनाकडून झालेला भ्रमनिरास आहेच. त्यात युतीच्या नेत्यांमध्ये दररोज विस्तवही जात नसल्याने जनतेमध्ये असलेल्या नाराजीचे प्रतिबिंब आगामी काळात उमटताना दिसणार आहे.