शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 27, 2024 18:43 IST

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांची माहिती : ३४,९०१ मुलांना देणार लस

सिंधुदुर्ग : ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेऊन शासनाच्या वतीने ३ मार्च रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील ३४,९०१ बालकांना ९०७ लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाणार आहे. तसेच ८० मोबाईल टीम, ४९ ट्रान्सिट टीम याद्वारे जोखिमग्रस्त भाग, यात्रा या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सई धुरी म्हणाल्या की, ३ मार्च २०२४ रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यादिवशी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मिळून ३४ हजार ९०१ मुलांना ही लस दिली जाणार आहेत. यासाठी ९०७ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ८० मोबाईल टीम, ४९ ट्रान्सिट टीम याद्वारे जोखीमग्रस्त भाग, यात्रा या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.त्याचबरोबर पल्स पोलिओ लसीकरण दिनानंतर ग्रामीण भागामध्ये तीन दिवस व शहरी भागामध्ये पाच दिवस आय.पी.पो. आय द्वारे ९०९ टीम द्वारे २,०५,०२४ घरांना भेटी देऊन लसीकरण करण्यात येणार आहे. एकूण ४९ ट्रान्सिट टीमची स्थापना करण्यात आली असून याद्वारे एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्थानके, यात्रेच्या ठिकाणी, विमानतळ, टोलनाके इत्यादी ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.

८० मोबाईल टीम८० मोबाईल टीमची स्थापना करण्यात आली असून याद्वारे तुरळक लाभार्थी असणाऱ्या ठिकाणी उदा. तुरळक वाड्या, वस्त्या, बांधकामाची ठिकाणे, खणी, ऊसतोड मजूर, वीटभट्ट्या, फुटपाथ इत्यादी ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. या टीममध्ये २ कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांच्याकडे १ वाहन देण्यात येणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग