शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

नारायण राणे यांचे सिंधुदुर्गात जंगी स्वागत

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

काँगे्रसमध्ये नवचैतन्य : ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी; विजयी घोषणांनी परिसर दणाणला

बांदा : विधानपरिषदेत बिनविरोध आमदारपदी निवडून आल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सोमवारी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर बांदा येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने नारायण राणे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि राणे यांच्या विजयी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी परिसर फुलून गेला होता. बांदा येथील कट्टा कॉर्नर चौकात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजू परब यांनी नारायण राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच नारायण राणे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. राणे यांच्या आमदारकीने जिल्हा काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले असून कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, सभापती आत्माराम पालयेकर, गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती प्रमोद कामत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, विकास सावंत, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, एम. के. गावडे, प्रज्ञा परब, दिगंबर पाटील, समीर नलावडे, रणजीत देसाई, मालवण नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, स्नेहा आचरेकर, नासीर काझी, कुडाळ नगरसेविका संध्या तेरसे, सावंतवाडी सभापती प्रमोद सावंत, बाळा गावडे, गुरुनाथ सावंत, संजीव शिरोडकर, सुधीर आडिवरेकर, प्रमोद गावडे, प्रियांका गावडे, बबन राणे, डेगवे उपसरपंच मधु देसाई, डेगवे सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई, तात्या वेंगुर्लेकर, बाळु सावंत, स्वप्निल नाईक, सिध्देश महाजन, तेजस परब, युवक शहर अध्यक्ष संदीप बांदेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण राणे यांनी शुभेच्छांचा स्विकार करीत कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने कार्यरत व्हावे, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. (प्रतिनिधी)