शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा; कणकवलीत मुख्यमंत्र्यांसह राजकीय दिग्गजांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 19:45 IST

एकाच विमानातून दिग्गज नेत्यांचा प्रवास

कणकवली:माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कणकवलीत राजकीय शक्तीप्रदर्शनासोबतच स्नेहाचा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील आणि केंद्रातील दिग्गज नेत्यांची फौज कणकवलीत दाखल झाली आहे.

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड हे सर्व नेते एकाच विमानाने चिपी विमानतळावर उतरले.

​विमानतळावर आमदार नितेश राणे यांनी या सर्व पाहुण्यांचे जल्लोषात आणि अगत्याने स्वागत केले. तेथून सर्व नेतेमंडळी राणे यांचे निवासस्थान असलेल्या 'ओम गणेश' येथे पोहोचली आहेत. काही वेळातच नडवे नाका येथे आयोजित भव्य सोहळ्याला हे सर्व नेते उपस्थित राहणार असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.

एकाच विमानातून दिग्गज नेत्यांचा प्रवास​महायुतीमधील एकजूट आणि नारायण राणे यांचा राजकीय दबदबा आज पुन्हा एकदा दिसून आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री आणि दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष एकाच विमानाने कोकणात दाखल झाले. राजकीय वर्तुळात या प्रवासाची आणि उपस्थितीची मोठी चर्चा रंगली आहे.

'ओम गणेश' वर पाहुणचार आणि नितेश राणे यांचे स्वागतचिपी विमानतळावर आगमन होताच आमदार नितेश राणे यांनी सर्व नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 'ओम गणेश' या निवासस्थानी सध्या उत्सवाचे वातावरण असून, राणे कुटुंबीयांकडून सर्व दिग्गज नेत्यांचा यथोचित पाहुणचार केला जात आहे. नडवे नाका येथील मुख्य कार्यक्रम स्थळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Narayan Rane's birthday celebration: Political giants gather in Kankavli.

Web Summary : Kankavli witnessed a political gathering for Narayan Rane's birthday. Chief Minister Fadnavis, Gadkari, and other leaders arrived, showcasing unity. Nitesh Rane welcomed them at the airport and at 'Om Ganesh', followed by a grand event at Nadave Naka, drawing district-wide attention.
टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Kankavliकणकवली