शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 23:08 IST

कणकवलीत नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी सोहळ्याप्रसंगी दिग्गज नेत्यांची मांदियाळी जमली होती.

कणकवली : नारायण राणे हे गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्याचा मुख्यमंत्री असा संघर्षमय प्रवास करणारे नेतृत्व आहे. वरून काटेरी वाटले तरी अंतःकरणातून ते कोकणी फणसासारखे मऊ आणि दिलदार आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा गौरव केला. कणकवली येथे शुक्रवारी (१० एप्रिल) राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी सोहळ्याप्रसंगी दिग्गज नेत्यांची मांदियाळी जमली होती.

'त्या' चिठ्ठीने दिली प्रेरणा -मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माझ्या संसदीय यशाचे श्रेय राणे साहेबांना जाते. विधानसभेतील माझ्या पहिल्या भाषणानंतर त्यांनी अवघ्या ७ मिनिटांत कौतुकाची चिठ्ठी पाठवून माझा उत्साह वाढवला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. जेव्हा राणे साहेब अर्थसंकल्पावर बोलायचे, तेव्हा एखादा अर्थतज्ज्ञ बोलतोय असे वाटायचे. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे तत्कालीन अर्थमंत्रीही चिंतेत पडायचे.

कोकण विकासाचा ध्यास

फडणवीस म्हणाले, नारायण राणे यांच्या मनात सदैव कोकणच्या विकासाचा विचार असतो. त्यांच्या मेडिकल कॉलेजमधून १५० डॉक्टर बाहेर पडले, हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे. त्यांनी सत्तेचा वापर नेहमी गरिबांचे संसार उभे करण्यासाठी केला.

कोकणचा बुलंद आवाज : नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, राणे साहेब म्हणजे कर्तृत्वाने 'साहेबांचा शब्द' काय असतो हे दाखवून देणारे झंझावाती नेतृत्व आहे. प्रखर हिंदुत्वाचा विचार ही त्यांची मोठी ताकद आहे. ७४ वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. ते दिसायला कडक असले तरी कार्यकर्त्यांवर लहान भावासारखे प्रेम करणारे सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाबाबत ग्वाही व दिलगिरी

येत्या मे महिन्यापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल," असे आश्वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिले. अनेक वर्षे या महामार्गाचे काम रखडल्यामुळे कोकणवासीयांना जो त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली.

मेहनतीनेच यश शक्य : नारायण राणे

सत्काराला उत्तर देताना नारायण राणे भावूक झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे दैवत असून त्यांच्यामुळेच मी इथवर पोहोचलो. आयुष्यात मेहनतीच्या जोरावर सर्व काही साध्य करता येते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ७४ व्या वर्षात पदार्पण करताना मिळालेली ही माणुसकी हेच माझे खरे संचित असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये फडणवीस यांच्याशी झालेला संवाद आणि पदाचा मिळालेला सन्मान याचा उल्लेख करत, जनसेवेचे काम अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सोहळ्याला या नेत्यांची उपस्थिती

या सोहळ्याला नीलम राणे, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत,उपाध्यक्ष दादा साहील, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिंदेसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, दीपलक्ष्मी पडते,अबिद नाईक, समीर नलावडे, अशोक सावंत, संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश पवार, प्रास्ताविक डॉ. मिलिंद कुलकर्णी तर आभार नितेश राणे यांनी मानले.

English
हिंदी सारांश
Web Title : Narayan Rane: A self-made leader, celebrated by Fadnavis on 74th birthday.

Web Summary : Devendra Fadnavis lauded Narayan Rane's journey from humble beginnings to Chief Minister. Gadkari praised Rane's Hindutva and dedication to Kokan's development. Rane credited Balasaheb Thackeray for his success and pledged continued public service. Gadkari promised completion of Mumbai-Goa highway soon.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे Nitin Gadkariनितीन गडकरीsindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण