शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ गड-किल्यांमध्ये नांदगाव किल्ल्याचाही समावेश

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 2, 2023 13:10 IST

कोटाचा माळ येथे घोडे बांधण्याची जागा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासन दप्तरी असलेल्या ३८ गड-किल्ल्यांमध्ये कणकवली तालुक्यातील नांदगाव किल्ल्याचाही समावेश आहे. कणकवली तालुक्यात नांदगाव व खारेपाटण या गावात किल्ला म्हणून नोंद आहे. नांदगाव कोटाचा माळ म्हणून सुपरिचित असलेल्या ठिकाणी ही नोंद असल्याचे दिसून आली आहे. या किल्ल्याची माती मालवण किल्ला येथे बुधवारी नेण्यात आली.जिल्हा परिषदेकडून या ३८ किल्ल्यातील माती गोळा करून ती एकत्रित मालवण किल्ला येथे दिनांक १ नोव्हेंबर रोजी नेण्यात येणार आहे. म्हणून जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार नांदगाव ग्रामपंचायतीकडून पूर्वतयारी करून पुरोहित यांच्या हस्ते विधिवत पूजा करून माती गोळा करण्यात आली.माती गोळा करतेवेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे, पुरोहित शरद गगनग्रास, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोटाचा माळ येथे घोडे बांधण्याची जागानांदगाव ग्रामपंचायतनजिक कोटाचा माळ म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. शासनदरबारी त्याची नांदगाव किल्ला अशी नोंद आहे. त्याचा पूर्वेतिहास पाहता जुने जाणते जाणकार लोक तिथे पागेचा माळ नावानेसुद्धा एक ठिकाण आहे, असे सांगतात आणि त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी घोडे बांधायची जागा होती. ते घोडे राजापूर या ठिकाणाहून येत असत आणि या कोटाचा माळ या ठिकाणी थांबत असत. त्यानंतर ते सावंतवाडीला जात असत, अशी जाणकारांकडून माहिती मिळाली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगड