देवगड : गेले अनेक वर्ष देवगड पवनऊर्जा प्रकल्पाला आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी होती. या संदर्भात वारंवार प्रस्ताव पाठविण्यात येत होते. याच अनुषंगाने आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत प्रकाश गोगटे यांच्या हस्ते देवगड येथील पवन ऊर्जा प्रकल्पास आप्पा गोगटे पवनऊर्जा प्रकल्प असे नामकरण करण्यात आले.तसेच याच परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या गार्डन परिसराची पाहणी आमदार राणे यांनी यावेळी केली.नगराध्यक्षा प्रणाली माने, उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश राणे, तालुकाध्यक्ष अमोल तेली, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर खवळे, महिला बालकल्याण सभापती उज्ज्वला अदम, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर, निशिकांत साटम, नगरसेवक बापू जुवाटकर, विकास कोयंडे, श्रुती जाधव उपस्थित होते.
देवगडच्या पवनउर्जा प्रकल्पाचे नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:37 IST
गेले अनेक वर्ष देवगड पवनऊर्जा प्रकल्पाला आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी होती. या संदर्भात वारंवार प्रस्ताव पाठविण्यात येत होते. याच अनुषंगाने आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत प्रकाश गोगटे यांच्या हस्ते देवगड येथील पवन ऊर्जा प्रकल्पास आप्पा गोगटे पवनऊर्जा प्रकल्प असे नामकरण करण्यात आले.
देवगडच्या पवनउर्जा प्रकल्पाचे नामकरण
ठळक मुद्देदेवगडच्या पवनउर्जा प्रकल्पाचे नामकरणनव्याने उभारण्यात येणाऱ्या गार्डन परिसराची पाहणी