शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : नादब्रम्ह समारोह २०१९ : नववर्षाचा पहिलाच विकेंड सावंतवाडीकरांसाठी संगीतमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 14:00 IST

नववर्षाचा पहिलाच विकेंड सावंतवाडीकरांसाठी संगीतमय ठरला तो नादब्रम्ह समारोह २०१९ च्या स्वर, ताल, लय, धून यांच्या बहारदार आविष्काराने. नाट्यगीत स्पर्धेचे विजेते उदयोन्मुख कलाकार आणि परिवारातील नव्या पिढीने एकाहून एक सरस आणि सुरस नाट्यपदांनी रसिकांच्या मनमंदिरात नादब्रम्ह साकारले. २००३ साली सुरू झालेल्या समारोहाचे हे यंदाचे १६ वे वर्ष होते.

ठळक मुद्देनववर्षाचा पहिलाच विकेंड सावंतवाडीकरांसाठी संगीतमयनादब्रम्ह समारोह २०१९ : बालकलाकारांनी कार्यक्रमात आणली रंगत

सावंतवाडी : नववर्षाचा पहिलाच विकेंड सावंतवाडीकरांसाठी संगीतमय ठरला तो नादब्रम्ह समारोह २०१९ च्या स्वर, ताल, लय, धून यांच्या बहारदार आविष्काराने. नाट्यगीत स्पर्धेचे विजेते उदयोन्मुख कलाकार आणि परिवारातील नव्या पिढीने एकाहून एक सरस आणि सुरस नाट्यपदांनी रसिकांच्या मनमंदिरात नादब्रम्ह साकारले. २००३ साली सुरू झालेल्या समारोहाचे हे यंदाचे १६ वे वर्ष होते.निधी शिरोडकर, निधी जोशी, सुधांशू सोमण आणि विधिता केंकरे या बालकलाकारांनी कार्यक्रमात रंगत आणली. तर किशोरवयीन कलाकार अक्षय जांभळे, संपदा खोबरेकर, काजल परब, मधुरा खानोलकर आदी कलाकारांनी रसिकांना नाट्यसंगीताच्या सुवर्णकाळात नेले. नादब्रम्ह परिवारातील नवे आश्वासक सूर अर्थात साक्षी शेवडे, अदिती गोगटे आणि सावनी शेवडे या त्रयीने या संगीत मंदिरावर कळस चढविला.निमंत्रित कलाकारांच्या मैफिलीपूर्वी समारोहाचा शुभारंभ पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, नादब्रम्हचे अध्यक्ष प्रदीप शेवडे, उपाध्यक्ष सतीश शेजवलकर, प्रमुख पाहुणे विहंग देवस्थळी, नगरसेवक बाबू कुडतरकर, आनंद नेवगी, सागर बांदेकर, दीपाली भालेकर आदी उपस्थित होते.प्रास्ताविक सतीश शेजवलकर यांनी केले. उद्घाटक नगराध्यक्ष साळगावकर यांनी उदयोन्मुख कलाकारांचे कौतुक केले व अशा उपक्रमास नगरपालिकेचे सदैव सहाय्य राहील, असे आश्वासन दिले. मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तर नाट्यसंगीत स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. आभार शेखर पणशीकर यांनी मानले.

टॅग्स :musicसंगीतsindhudurgसिंधुदुर्ग