शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत माय माती, माय माणसं, माय संस्कृती खाद्योत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 10:30 IST

युरेका सायन्स क्लब कणकवलीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आणि बच्चे कंपनीचा सहभाग असलेल्या 'माय माती, माय माणसं, माय संस्कृती ' खाद्योत्सवाला खवय्यांचा चांगला प्रतिसाद लाभला . तर बच्चे कंपनीने एक आगळा वेगळा अनुभव या खाद्य महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या गाठीशी बांधला.

ठळक मुद्दे कणकवलीत माय माती, माय माणसं, माय संस्कृती खाद्योत्सव बच्चे कंपनीच्या गाठीशी एक आगळा अनुभव !; युरेका सायन्स क्लबचे आयोजन

कणकवली : युरेका सायन्स क्लब कणकवलीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आणि बच्चे कंपनीचा सहभाग असलेल्या 'माय माती, माय माणसं, माय संस्कृती ' खाद्योत्सवाला खवय्यांचा चांगला प्रतिसाद लाभला . तर बच्चे कंपनीने एक आगळा वेगळा अनुभव या खाद्य महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या गाठीशी बांधला.कणकवली येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात गावठी आठवडा बाजाराच्या ठिकाणी रविवारी या खाद्योत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विस्मृतीत गेलेल्या पारंपारीक वस्तू , मालवणी खाद्यसंस्कृतीतील पर्यावरण पुरक वस्तू या खाद्योत्सवाच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. या खाद्योत्सवाचे आयोजन करण्यात इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.यामध्ये जयवर्धन केणी , कल्पक फणसळकर, प्रसाद गावडे, श्रेयश रूईकर, उर्वी गवाणकर, वैष्णवी माणकर, तेजस शेट्टी, युक्ता देसाई, सार्थ खानोलकर, अर्थव बोर्डवेकर, मैथीली यादव, इक्रा नाईक, आर्या मांजरेकर, सतेज शेट्टी, आदित्य रेवडेकर, वेद वाळके आदी विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने विविध खाद्यपदार्थ विक्रीचा अनुभव घेतला आणि आनंद लुटला.भारतीय परंपरा जोपासण्याच्यादृष्टीने हा खाद्योत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याठिकाणी पारंपारीक वस्तूचे प्रदर्शन व पदार्थांची विक्री करण्यात आली . मुलांना लहान वयातच व्यवहारिक ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने हा खाद्योत्सव महत्वपूर्ण ठरला.उकडीचे मोदक, आंबोळी, शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तूंचे स्टॉल या खाद्योत्सवात उभारण्यात आले होते. त्यांना कणकवलीतील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबीद नाईक, संजय मालंडकर , ज्येष्ठ व्यापारी अपिशेठ गवाणकर, सुषमा केणी, ऍड. विलास परब , ऍड. मिलिंद सावंत, दादा पालकर, डॉ. निलेश कोदे आदी मान्यवरांनी या खाद्योत्सवाला भेट दिली. तसेच बच्चे कंपनीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. 

टॅग्स :foodअन्नsindhudurgसिंधुदुर्ग