शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
2
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
3
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
4
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
5
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
6
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
7
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
8
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
11
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
12
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
13
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
14
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
15
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
16
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
17
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
18
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
19
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकांचा फड वर्षअखेरीस रंगणार

By admin | Updated: October 18, 2016 00:58 IST

१६५ शहरांत रणधुमाळी : २७ नोव्हेंबरला मतदान

मुंबई, ठाणे वगळता आचारसंहिता लागूमुंबई : महाराष्ट्राच्या नागरी भागाचा हिस्सा असलेल्या १४७ नगरपालिका आणि १८ नगरपंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार असून, या निवडणुकीसाठी मुंबई, ठाणे वगळता इतरत्र सोमवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.राज्यातील १९२ नगरपालिका आणि २० नगरपंचायतींसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यांत १६५ शहरांतील पालिकांचा समावेश असून, नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या लहान शहरांचा कौल कोणाकडे, याबाबत उत्सुकता आहे.निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. नगरपालिकांच्या अध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होईल. तसेच तेथे प्रभाग पद्धत असेल. त्यामुळे एक मतदार तीन ते चार (अध्यक्षांसह) मते देईल. नगर-पंचायतींमध्ये मात्र वॉर्ड पद्धतीने निवडणूक होणार असून, तेथे नगरसेवकांमधून अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. एकूण ४,७५० जागांचा फैसला होणार आहे. पनवेल व नागभीड यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने निवडणूक होणार नाही.सांगलीत पाच नगरपरिषदा, चार नगरपंचायतीसांगली : जिल्ह्यातील पाच नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार २७ नोव्हेंबरला मतदान होणार असून, लगेच २८ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या चार नगरपंचायती आणि पलूस येथील नगरपरिषदेसाठी प्रथमच मतदान होत आहे, तर नगरपरिषद असलेल्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची थेट जनतेतून निवड होणार असल्याने या निवडणुकीची रंगत वाढणार आहे. सोमवारी आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या सदस्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाल्याने निवडणूक जाहीर होण्याची शक्यता होती. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांनी आपले अर्ज आॅनलाईन पध्दतीने सादर करावयाचे असून, माहिती भरल्यानंतर त्याची प्रिंट सादर करावी लागणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने एक संगणक प्रणाली विकसित केली आहे. जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, तासगाव, आष्टा आणि पलूस या नगरपरिषदेसाठी, तर कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव आणि शिराळा नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार आहे, तर नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षांची निवड निवडून आलेल्या सदस्यांतून होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू केली आहे. (पान १ वरून) टप्पा क्र . १ २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या नगरपालिका व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: पालघर : १) विक्र मगड (नवीन न.पं.), २) तलासरी (नवीन न.पं.) व ३) मोखाडा (नवीन न.पं.). रायगड : १) खोपोली,२) उरण, ३) पेण, ४) अलिबाग, ५) मुरूड-जंजिरा, ६) रोहा, ७) श्रीवर्धन, ८) महाड, व ९) माथेरान.रत्नागिरी: १०) चिपळूण, ११) रत्नागिरी, १२) दापोली न.पं., १३) खेड व 5) राजापूर. सिंधुदुर्ग: १) वेंगुर्ले, २) सावंतवाडी, ३) मालवण व ४) देवगड-जामसांडे (नवीन न.पं.)^$-सोलापूर: १) बार्शी, २) पंढरपूर, ३) अक्कलकोट, ४) करमाळा, ५) कुर्डूवाडी, ६) सांगोला, ७) मंगळवेढा, ८) मैंदर्गी व ९ ) दुधनी. कोल्हापूर: १) इचलकरंजी, २) जियसंगपूर, ३) मलकापूर, ४) वडगाव-कसबा, ५) कुरूंदवाड, ६) कागल, ७) मुरगुड, ८) गडिहिंग्लज व ९) पन्हाळा. सांगली: १) इस्लामपूर, २) विटा, ३) आष्टा, ४) तासगाव, ५) कवठे-महाकाळ (नवीन न.पं.), ६) कडेगाव (नवीन न.पं.) ७) खानापूर (नवीन न.पं.), ८) शिरोळा (नवीन न.पं.) व 9) पलूस (नवीन नगर परिषद)सातारा: १) सातारा, २) फलटण, ३) कराड, ४) वाई, ५) म्हसवड, ६) रहिमतपूर,७) महाबळेश्वर, ८) पाचगणी, ९) कोरेगाव (नवीन न.पं.), १०) मेढा (नवीन न.पं.), ११) पाटण (नवीन न.पं.), १२) वडूज (नवीन न.पं.), १३) खंडाळा (नवीन न.पं.) व १४) दहीवडी (नवीन न.पं.)-पुणे: १) बारामती, २) लोणावळा, ३) दौड, ४) तळेगाव-दाभाडे, ५) आळंदी, ६) इंदापूर, ७) जेजुरी, ८) जुन्नर,९) सासवड व १०) शिरूर. नगरपालिका सदस्य संख्याइस्लामपूर २८, विटा २४, आष्टा २१, तासगाव २१, पलूस १७.नगरपंचायती सदस्य संख्याकवठेमहांकाळ, शिराळा, खानापूर, कडेगाव प्रत्येकी १७ सदस्य संख्या. निवडणूक कार्यक्रम उमेदवारी अर्ज सादर करणे २४ ते २९ आॅक्टोबर, अर्जांची छाननी २ नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर, मतदान २७ नोव्हेंबर, मतमोजणी व निकाल २८ नोव्हेंबर २०१६. पुढील ८२ दिवस असतील आचारसंहितेचेपालिका निवडणुकीसाठीची आचारसंहिता आजपासून लागू झाली. त्यामुळे राज्य सरकारला मतदारांना प्रलोभन ठरेल असे कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. पुढील ८२ दिवस आचारसंहितेचे असतील. चार किंवा त्यापेक्षा अधिक नगरपालिकांची निवडणूक असलेल्या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जिल्हाभर आचारसंहिता असेल. तीन किंवा त्यापेक्षा कमी नगरपालिकांमध्ये निवडणूक असलेल्या जिल्ह्यात केवळ त्या नगरपालिका क्षेत्रापुरतीच आचारसंहिता असेल. सर्व ठिकाणची आचारसंहिता निकालानंतर संपुष्टात येईल. अशी होणार निवडणूकनिवडणूक होत नगरपालिका/ उमेदवारी अर्ज मतदानाची मतमोजणीअसलेले जिल्हे नगरपंचायती भरण्याचा कालावधीतारीखतारीख२५ जिल्हे १४७ नगरपालिका २४ ते २९ आॅक्टोबर २७ नोव्हेंबर २८ नोव्हेंबर१८ नगरपंचायती२ जिल्हे १४ नगरपालिका ११ ते १९ नोव्हेंबर १४ डिसेंबर १५ डिसेंबर४ जिल्हे २० नगरपालिका२ नगरपंचायती १९ ते २५ नोव्हेंबर १८ डिसेंबर १९ डिसेंबर२ जिल्हे ११ नगरापलिका ९ ते १७ डिसेंबर ८ जाने. १७ ९ जानेवारीराखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोचपावती उमेदवारी अर्जासोबत सादर करण्याची मूभा असेल. अशा उमेदवारांना निवडून निकालाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल.