शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

मोईन कधीकाळी होता पोलिसांचा खबऱ्या ?

By admin | Updated: September 22, 2015 23:53 IST

पाटणकर हत्याप्रकरण : कमी वयातच ‘त्याने’ बदलला मार्ग

रत्नागिरी : अभिजीत पाटणकर खून प्रकरणात सूत्रधार असल्याचा व गोळ्या झाडल्याचा ठपका असलेला मोईन काझी याला संगणकाची चांगली माहिती होती. त्यामुळे तो पोलिसांनाही संगणकविषयक मदत करीत होता. पोलिसात त्याची चांगली ओळख व उठबस होती. काही काळ त्याने पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही काम केल्याची चर्चा आता सुरू आहे. इतक्या कमी वयात त्याला गुन्हेगारी क्षेत्रात गुंतविण्यात नेमका कोणाचा आशीर्वाद होता, असा सवालही आता निर्माण झाला आहे. खराब वागणुकीमुळे शाळेतून काढून टाकलेल्या मोईनने रोजगारासाठी प्रथम गॅरेज व अन्य ठिकाणी काम करण्याचा मार्ग अवलंबला. परंतु काही वाईट संगतीच्या मित्रांमुळे तो अधिकच बिघडला. परंतु टेक्निकल विषयात तो तरबेज होता. त्यामुळे त्याने संगणकाची चांगली माहिती मिळवली. परिणामी सुरूवातीच्या काळात त्याने संगणकाबाबतची माहिती, वापर याबाबत पोलिसांनाही मदत केली. त्यातूनच त्याची काही पोलिसांशी चांगली ओळख निर्माण झाली. याच काळात त्याने पोलिसांचा खबऱ्या म्हणून काही काळ काम केले. मात्र, नंतर तोच गुन्हेगारी क्षेत्राशी संपर्कात आला. मोईनचे अवघे विश्वच बदलून गेले. कायद्याच्या रक्षकांना मदत करणारा मोईन हा नंतर स्वत:च भक्षक बनला. त्यानंतर त्याने ती वाटच कायम धरली आणि अभिजीत पाटणकर याला संपवूनच त्याने आपण अट्टल गुन्हेगार असल्याचे दाखवून दिले.त्याचे वय अवघे सतरा-अठरा असताना गुन्हेगारी क्षेत्रात वावरण्याचा बेडरपणा त्याच्यात आला कोठून, असा सवाल निर्माण झाला आहे. तो स्वत:हून या क्षेत्रात गेला की, त्याला या क्षेत्रात जाण्यासाठी कोणाकडून प्रोत्साहन दिले गेले, याबाबतही तर्कवितर्क सुरू झाले आहेत. तो लखनौला कसा गेला, कोणी पाठविले, तेथे जाण्यात त्याला कोणाची ओळख उपयोगाची पडली, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप सापडलेली नाहीत. तसेच मोईन काझी रत्नागिरीत वावरत असताना त्याच्यासोबत असलेले त्याचे मित्र कोण, ते आता काय करीत आहेत, याचीही चौकशी झाली तर मोईनप्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत, याची माहितीही मिळू शकेल. (प्रतिनिधी)मित्रांची चौकशीसंगणक ज्ञानामुळे पोलिसांतही उठबस!त्याच्या मित्रांची चौकशी ठरणार महत्वाची.इतक्या कमी वयात गुन्हेगारी क्षेत्रात गुंतवण्यात कोणाचा आशिर्वाद? सवाल अजूनही तसाच.रोजगारासाठी मोईनने रोजगारासाठी गॅरेज व अन्य ठिकाणी काम करण्याचा निवडला मार्ग.वाईट संगतीच्या मित्रांमुळे अधिकच बिघडला.तंत्रज्ञान विषयात मोईनला विशेष माहीती.मोईनप्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरु.तस्करीचे व्यवहारही उघड होणार ?आमदाराच्या गाडीवर चालक ?लखनौमध्ये शिरकाव केल्यानंतर मोईन तेथील एका आमदाराच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत असल्याचे मोईन रत्नागिरीत आला की, त्याच्या मित्रांना सांगायचा. परंतु आमदारासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या गाडीचा चालक म्हणून काम करण्यासाठी त्याची शिफारस कोणी केली होती का? केली असेल तर शिफारस करणारी व्यक्ती रत्नागिरी वा राज्यातील होती काय? रत्नागिरीतील काही असामींचे लखनौशी आधीच आर्थिक सूत जुळलेले आहे काय? त्यातूनच लखनौमध्ये मोईन पोहोचला काय? की आणखी कोणी माफिया जगतातील व्यक्ती त्याच्या संपर्कात आली होती? याचा शोध घेणे आवश्यक आहे. कारण त्यातून रत्नागिरीसह राज्यात घडणाऱ्या बेकायदा व्यवहारांची, प्राण्यांच्या कातड्यांची होणारी तस्करी व अन्य अमली पदार्थांचे व्यवहार समोर येऊ शकतील. त्यामुळे पांढऱ्या कपड्यात राहून असले उद्योग करणारे उघड होतील व तरुणाईला व्यसनाधीन करणाऱ्यांवर टाच येईल.चालकाचे काम!लखनौ येथे जाण्याआधी मोईन रत्नागिरीतच काम करीत होता. रत्नागिरीतील एका वजनदार पुढाऱ्याकडेही त्याने काही काळ चालक म्हणून काम केल्याची चर्चाही रंगली आहे. हा पुढारी कोण, त्याच्याकडे मोईन चालक म्हणूनच काम करायचा की, अन्य काही कामेही करायचा? याच काळात तो गुन्हेगारी क्षेत्रातील काही लोकांशी संपर्कात आला काय? यांसारखे अनेक प्रश्न मोईन प्रकरणाने निर्माण केले आहेत.