शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीतच व्हावे : ही तर राजघराण्याची ईच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:06 IST

सावंतवाडीतील रुग्णांना सोईचे व्हावे यासाठी सावंतवाडीत मंजूर झालेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय कुटीर रुग्णालयाच्या परिसरातच व्हावे, अशी खुद्द राजे खेमसावंत यांच्यासह राजघराण्याची इच्छा आहे. त्यामुळे याचठिकाणी रुग्णालय उभारण्याबाबत शासनाकडून विचार केला जावा, अशी प्रतिक्रिया सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत यांनी दिली. ​​​​​​​

ठळक मुद्दे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीतच व्हावे ही तर राजघराण्याची ईच्छा :लखम सावंत

सावंतवाडी : सावंतवाडीतील रुग्णांना सोईचे व्हावे यासाठी सावंतवाडीत मंजूर झालेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय कुटीर रुग्णालयाच्या परिसरातच व्हावे, अशी खुद्द राजे खेमसावंत यांच्यासह राजघराण्याची इच्छा आहे. त्यामुळे याचठिकाणी रुग्णालय उभारण्याबाबत शासनाकडून विचार केला जावा, अशी प्रतिक्रिया सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत यांनी दिली.यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव लवकरात लवकर राजघराण्याकडे द्या, असे खुद्द आमच्याकडून माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना सांगितले आहे. त्यांनीही ते मान्य केले आहे. परंतु काही लोक अन्यत्र रुग्णालय नेण्याच्या गोष्टी करीत आहेत, असेही ते म्हणाले.सावंतवाडी शहरात उभारण्यात येणारे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अन्य ठिकाणी नेण्यासंदर्भात शिवसेनेतील काही मंडळींकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. या ठिकाणी असलेली जागा राजघराण्याकडून मिळण्यास अडचणी येत आहेत, असे सांगून यासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे.

त्यासंदर्भात लखम सावंत म्हणाले, माजी पालकमंत्री तथा आमदार केसरकर यांनी राजघराण्याशी चर्चा केली होती. त्यांना हा विषय माहीत आहे. आम्ही जागा देणार नाही अशी भूमिका कधीही घेतली नाही. परंतु काही लोक अन्य भूमिका मांडत आहेत. पर्यायी जागा शोधत आहेत, असे ते म्हणाले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग