शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी लाचार झालेल्यांना धडा शिकवूया - खासदार विनायक राऊत

By सुधीर राणे | Updated: August 29, 2022 15:57 IST

केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी आर्थिक प्रलोभन दाखवून शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे.

कणकवली : केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी आर्थिक प्रलोभन दाखवून शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे. अशा या सत्तेसाठी लाचार झालेल्यांना धडा शिकवूया. ग्रामीण भागातील शिवसेना मजबूत होती, ती यापूढेही मजबूतच राहील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी कनेडी येथे व्यक्त केला.शिवसेनेच्या नाटळ, सांगवे, हरकुळ बुद्रुक विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आज, सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत आदीसह मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी  परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले, सह्याद्री पट्ट्यातील मावळा हा नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे. कोकणातील हा मावळा शिवसेनेमुळे वेगवेगळ्या पदावर पोचला. मात्र, काही लोकांनी गद्दारी केली. गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा शिवसेनेच्या लोकांनी दाखवलेली आहे. आताही तीच परिस्थिती राहील. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळेच या भागातील अनेक प्रश्न आम्ही गेल्या पाच वर्षात सोडवू शकलो. नरडवे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कुंभवडे धरणाची कामही पुढच्या वर्षी पूर्ण होईल. त्यामुळे या भागात सिंचन क्षेत्र वाढवून हा भाग सुजलाम सुफलाम होईल.आमदार नाईक म्हणाले, या भागामध्ये शिवसेनेची सत्ता कायम होती. याही पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, ग्रामपंचायतची सत्ता शिवसेना मिळवेल. इथला शिवसैनिक नेहमीच पक्षाच्या बाजूने राहिला आहे. तो कुठल्याही दबावाला बळी पडलेला नाही. यावेळी गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते यांनीही मार्गदर्शन केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत