शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

खारेपाटणमध्ये विजेच्या धक्क्याने आई, मुलगा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 23:05 IST

खारेपाटण : येथील हसोळटेंब कोंडवाडी येथे घरासमोरील अंगणात कपडे वाळत घालत असताना विद्युतभारित तारेला स्पर्श झाल्याने आई व मुलाचा मृत्यू झाला. भाग्यश्री बाळकृष्ण शिंदे (वय ६०) व संजय बाळकृष्ण शिंदे (३५) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली.खारेपाटण गटविकास सेवा सोसायटीत बाळकृष्ण शंकर शिंदे हे लिपिक ...

खारेपाटण : येथील हसोळटेंब कोंडवाडी येथे घरासमोरील अंगणात कपडे वाळत घालत असताना विद्युतभारित तारेला स्पर्श झाल्याने आई व मुलाचा मृत्यू झाला. भाग्यश्री बाळकृष्ण शिंदे (वय ६०) व संजय बाळकृष्ण शिंदे (३५) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली.खारेपाटण गटविकास सेवा सोसायटीत बाळकृष्ण शंकर शिंदे हे लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी भाग्यश्री शिंदे या गुरुवारी सकाळी अंगणात बांधण्यात आलेल्या तारेवर धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी गेल्या. त्या तारेला घरातून आलेल्या विद्युतवाहिनीचा स्पर्श झाला असल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का लागला व त्या जमिनीवर कोसळल्या. आई जमिनीवर पडल्याचा आवाज येताच त्यांचा मुलगा संजय शिंदे हा घराबाहेर धावत आला. त्याने आईला वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यालाही या तारेचा स्पर्श झाल्याने जोरदार धक्का बसला. त्यामुळे दोघेही बेशुद्ध पडले.हसोळटेंब कोंडवाडी येथील काही ग्रामस्थांंनी खारेपाटणचे सरपंच रमाकांत राऊत यांना यांची कल्पना दिली. त्यांनी पोलिसांना कळविले. बेशुद्धावस्थेतील आई व मुलाला तातडीने येथील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मंडावरे यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले.संजय हा साध्या राहणीमानाचा, प्रेमळ स्वभावाचा होता. घरातील तसेच शेतातील कामे तो करीत असे. तो अविवाहित होता.या घटनेची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार पांडुरंग राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी खारेपाटण कार्यालयाचे सहायक कनिष्ठ अभियंता किशोर मर्ढेकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर सबनीस (ओेरोस) यांना अपघाताची माहिती दिली. वीज वितरणच्यावतीने या घटनेचे पंचनामे वरिष्ठ अधिकारी आज, शुक्रवारी येऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आक्रोश काळीज हेलावणाराघटना घडली त्यावेळी बाळकृष्ण शिंदे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तसेच संजय शिंदे यांचे भाऊ सचिन शिंदे हेदेखील घरात नव्हते. आपली आई व भाऊ यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे सचिन यांनी तसेच आपली पत्नी व मुलगा गेल्याने बाळकृष्ण यांनी केलेला आक्रोश सर्वांचे काळीज हेलावणारा होता.