शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

सावंतवाडीत २७ पासून मान्सून महोत्सव

By admin | Updated: July 17, 2016 23:48 IST

प्रथमच आयोजन

सावंतवाडी : सावंतवाडीत प्रथमच मान्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून यात सावंतवाडी फाऊंडेशन, सावंतवाडी नगरपालिका, क्षितिज इव्हेंट, सुनील राऊळ मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव २७ ते ३० जुलै या कालावधीत होणार आहे. यावेळी वक्तृत्व, निबंध, पाककला स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक सुनील राऊळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फाऊंडेशनचे सुहास सावंत, बाळ पुराणिक, आशुतोष चिटणीस,अ‍ॅड. संतोष सावंत, प्रल्हाद तावडे, संदीप धुरी उपस्थित होते. महोत्सवातून कोकणातील लोककलांची नव्या पिढीला ओळख व्हावी, यासाठी लोककलांचे सादरीकरण आगळ्यावेगळ्या पध्दतीने करण्यात येणार आहे. २७ जुलैला महोत्सवाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता येथील मातृछाया मंगल कार्यालयात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र माजी सैनिक संघटना अध्यक्ष पी.एफ़. डान्टस, सभापती प्रमोद सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, सैनिक पतसंस्था चेअरमन शिवराम जोशी उपस्थित राहणार आहेत. यावेळी गरीब कुटुंबातील मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. २८ जुलै रोजी गवाणकर कॉलेज व पंचायत समिती यांच्या सहकार्यातून दुपारी ३ ते ५ या वेळेत गवाणकर कॉलेजमध्ये पाचवी ते आठवीसाठी वक्तृ त्व स्पर्धा होणार आहे. पहिला गट पाचवी ते सहावीसाठी विषय : माझा सिंधुदुर्ग जिल्हा, दुसरा गट सातवी आठवीसाठी : वृक्षसंवर्धन-काळाची गरज असे विषय दिले आहेत. २९ जुलै रोजी दुपारी ३ ते ५ गवाणकर कॉलेज येथे निबंध स्पर्धा होणार आहे. पहिला गट नववी ते दहावीसाठी कोकणचा पर्यटन विकास व खुल्या गटासाठी पर्यावरण अन् पर्यटन असे विषय आहेत. निबंधासाठी कागद आयोजक देणार आहेत. दोन्ही स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी नावे सैनिक पतसंस्था वैश्य भवन येथे व अ‍ॅड. संतोष सावंत, बाळ पुराणिक, हर्षवर्धन धारणकर यांच्याकडे नोंदवावीत. पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे १००० रूपये, ७०० रूपये व ५०० रूपये अशी बक्षिसे आहेत. ३० जुलै रोजी महोत्सवाचा समारोप सायंकाळी ३ ते ८ या वेळेत येथील बॅ. नाथ पै सभागृहात होणार आहे. यावेळी सांयकाळी ३ ते ४ या वेळेत पावसाळी ऋतुतील भाजीपाल्यावर आधारित पाककला स्पर्धा होणार आहे. यासाठी आशुतोष चिटणीस, हर्षवर्धन धारणकर यांच्याकडे नावे नोंदवावीत. त्यानंतर ५ ते ७ या वेळेत मान्यवरांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थी गौरव, ७ ते ९ या वेळेत लोककलांचे सादरीकरण होणार आहे. समारोपप्रसंगी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यख राजन पोकळे, विक्रांत सावंत, शिक्षण सभापती आत्माराम पालेकर, विशाल परब, प्रा. विजय फातर्पेकर उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)