शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

मणचे ग्रामसेवकाकडून अफरातफर

By admin | Updated: January 30, 2016 00:02 IST

देवगड पंचायत समिती सभेत उघड : सीईओंकडे कारवाईसाठी प्रस्ताव सादर

देवगड : मणचे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ए.एस. काळे यांनी ३ लाख ६२ हजार रूपयांचा ग्रामपंचायतचा निधी दुसऱ्या व्यक्तींच्या नावावरून काढून सरपंचांची खोटी सही करून त्या रकमेची अपरातफर केली असल्याचे उघड झाले आहे. या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी देवगड पंचायत समितीच्या सभेमध्ये करण्यात आली. कामात अनियमितता केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सदर ग्रामपंचायतीच्या अपरातफरीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. चौकशी करून ग्रामसेवक काळे यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांच्यामार्फत पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये सांगण्यात आले. देवगड पंचायत समितीची मासिक सभा नूतन सभापती रवींद्र जोगल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी शेखर जाधव उपस्थित होते. मणचे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक काळे यांनी ग्रामपंचायतीच्या निधी मधील ३ लाख ६२ हजार रूपये मणचे सरपंचांची खोटी सही करून अन्य पाच व्यक्तींच्या नावावरती चेक अदा केले. या व्यक्तींचा ग्रामपंचायतीशी कोणताही संबंध नव्हता. त्यांनी कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायतीची ठेकेदारी घेतली नव्हती. अशांना चेक देऊन त्या रकमेची अफरातफर करून कामात अनियमितता आणल्या प्रकरणी देवगड पंचायत समितीने सदरचा अहवाल त्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आला आहे. सखोल चौकशी करून दोषी ग्रामसेवकाला बडतर्फ करण्याचा अधिकार मुख्यकार्यकारी अधिकारी यांनाच असल्याचे पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. देवगड ग्रामीण रूग्णालयात संदीप कावले यांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मिळावी असा प्रश्न प्रणाली माने यांनी उपस्थित केला होता. यावरती संबंधित विभागाकडून अशी माहिती देण्यात आली की, चौकशी ही चौकशी तपासणी समितीमार्फत सुरू आहे. चौकशी पूर्ण झालेली नाही. चौकशी पूर्ण झाल्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. ग्रामीण रूग्णालय देवगड येथे दुपारनंतर आलेल्या रूग्णांचे एक्सरे काढले जात नाहीत. ते का काढले जात नाहीत याची वस्तुस्थितीदर्शक माहिती मिळावी असा प्रश्न संतोष किंंजवडेकर यांनी उपस्थित केला होता. यावरती माहिती देताना, तालुका आरोग्य अधिकारी संतोष कोंडके यांनी सांगितले, की ग्रामीण रूग्णालय देवगड येथे दुपारनंतर आलेल्या रूग्णांचे एक्सरे काढले जात नाहीत. याबाबतची चौकशी केली असता एक्सरे मशिलमध्ये एक पार्ट (मदर बोर्ड) बदलणे आवश्यक असल्याचे संबंधित अभियंता यांनी सांगितले. या मशिनबाबत २२ डिसेंबर २०१५ रोजी संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार, वैद्यकिय अधिकारी ग्रामीण रूग्णालय देवगड या कार्यालयातून केला आहे. नळ योजनेंतर्गत कलंबई वाडीतील १४३ नळ धारकांना हुर्शी, रेडेबांध कोठारवाडी या वाडीतील ४१ नळधारकांना पाणी पुरवठा केला जात आहे. उर्वरित पुरळ हुर्शी या दोन वाड्यांना पाणीपुरवठा होत नाही. सदर विषयाबाबत उपअभियंता ग्रामपंचायत पाणीपुरवठा देवगड व अध्यक्ष अनिल पुरळकर, ग्राम आरोग्य पोषण व पाणी पुरवठा समिती पुरळ यांची गटविकास अधिकारी यांच्या दालनात समक्ष चर्चा झाल्यानुसार ग्रामीण पाणीपुरवठामार्फत पुरळ व हुर्शीतील टाक्यांमध्ये पाणी पुरवठा झाल्यास वाड्यांना ग्रामपंचायतमार्फत पाणी पुरवठा करता येईल असे अध्यक्ष यांनी चर्चेमध्ये स्पष्ट केले. त्यास अनुसरून उपअभियंता देवगड ग्रामीण पाणीपुरवठा यांनी ग्रामपंचायतीने परवानगी दिल्यास पुरळ हुर्शीच्या नळ योजनेच्या टाकीमध्ये पाणी सोडण्यात येईल असे स्पष्ट केले. यावरती किंंजवडेकर हे असमाधानीच होते. या नळ योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. असा त्यांनी आरोप केला.(प्रतिनिधी)